फडणवीसांना अमित शहा हे आदेश बांदेकर सारखे वाटले असतील- उद्धव ठाकरे
फडणवीस आणि त्यांच्या शिष्टमंडळाच्या दिल्लीवारी येथील गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीबाबत खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना प्रश्न विचारला होता. साखर घरातच लागत असल्याने ते गृहमंत्र्यांना भेटले असावेत. आदेश बांदेकर होम मिनिस्टरचा कार्यक्रम करतात. फडणवीसांनाही गृहमंत्री तसेच वाटले असावेत म्हणून शहांना ते भेटले असावेत, अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांना टोला हाणला.

विरोधीपक्ष नेते फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन राज्यातील शेखर प्रश्नावर भेट घेऊन साविस्थार चर्चा केली अशी माहिती फडणवीसांनी प्रसार माध्यमांना दिली होती. त्यावर उद्धव ठाकरे यांनी टीका केली आहे.

फडणवीसांना संपूर्ण भारतातील साखर उद्योगाची चनता सतावत असेल. त्याचमुळे त्यांनी मंत्री शहा यांची भेट घेतलेली असावी असा मार्मिक टोला मुख्यमंत्र्यांनी फडणवीसांना लगावला होता. पण शहाकडे गृहखाते आहे त्याचा आणि साखरेच्या प्रश्नाचा संबंध काय? असा सवाल शिवसेना नेते संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंना केला.

त्यावर साखर घरातच लागते ना. गृहात. त्यामुळे फडणवीस तिकडे गेले असावेत. त्यांना गृहखातं… गृहमंत्री हे आदेश बांदेकरांसारखे वाटले असावेत. बांदेकर कार्यक्रम करतात… होम मिनिस्टर… त्यांना वाटलं असेल गृहमंत्रीही होम मिनिस्टर आहे… साखर घरात लागते… म्हणून गेले असतील त्यांच्याकडे साखरेचा प्रश्न घेऊन, असा टोला फडणवीसांना हाणला.