वाचा जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार काय चालू आणि काय बंद राहणार
सोलापूर : सोमवार ते शुक्रवारी सकाळी सात ते रात्री आठ पर्यंत बेकरी, दूध डेअरी, भाजीपाला, किराणा दुकाने, खाद्यपदार्थ, मेडिकल यासारखे अत्यावश्यक सेवा वगळता ग्रामीण भागात सर्व दुकाने ३० एप्रिल पर्यंत बंद राहतील.

तसेच शनिवारी-रविवारी पूर्णता बंद राहील. उर्वरित कालावधीमध्ये सोमवार ते शुक्रवार रात्री ८ ते सकाळी ७ पर्यंत आणि पुढे शुक्रवारी रात्री ८ ते सोमवारी सकाळी ७ पर्यंत कोणत्याही व्यक्तीस कोणत्याही वैद्य करण्याशिवाय किंवा परवानगीशिवाय संचार करण्यास बंदी राहील
या काळात उद्योगांना मुभा देण्यात आली आहे. उद्योजकांना कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांची अंमलबजावणी करून उद्योग सुरू ठेवता येईल, असे आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी सोमवारी रात्री काढले आहे.

आदेशातील ठळक बाबी…
हॉस्पिटल, डायग्नॉस्टिक सेंटर, क्लिनिक, वैद्यकीय विमासंबंधी कार्यालये, फार्मसी कंपन्या, इतर वैद्यकीय व आरोग्य सेवेला मुभा
किरणा, भाजीपाला दुकाने, डेअरी, बेकरी, कन्फेक्शनरी, खाद्य पदार्थांची दुकाने निर्धारित वेळेत सुरु राहतील
सार्वजनिक वाहतूक (रेल्वे, टॅक्सी, ऍटोरिक्षा, बस) सुरु राहतील; प्रवाशांची मर्यादा पाळावीच लागेल
स्थानिक प्रशासनाची मान्सून पूर्व कामे सुरु राहतील; मालवाहतूक, कृषी निगडीत सेवा, ई-कॉमर्स, प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी यांना सवलत
बागा, सार्वजनिक मैदाने, बीच रात्री आठ ते सकाळी सातपर्यंत, सोमवार ते शुक्रवार या आठवड्याच्या दिवशी बंद राहतील; सकाळी सात ते रात्री आठपर्यंत निर्बंध पाळावे लागतील
दुकाने, मार्केट, मॉल संपूर्ण दिवसभर बंद राहतील; अत्यावश्यक सेवेच्या दुकानात ग्राहकांना नियमांचे बंधन
दुकानांचे मालक, दुकानदारांनी व कर्मचाऱ्यांनी लसीकरण करून घ्यावे; ऑटोरिक्षात चालक आणि दोन प्रवासी असावेत
चारचाकी वाहनात चालकासह एकूण प्रवासी क्षमतेच्या 50 टक्के प्रवासी असावेत; बसमध्ये आरटीओच्या पासिंगनुसार पूर्ण क्षमतेने असतील प्रवासी
सार्वजनिक वाहतूक करणाऱ्यांना मास्कचे बंधन; नियमांचे उल्लंघन केल्यास पाचशे रुपयांचा दंड; एका खेपेनंतर सॅनिटायझेशन करण्याचे बंधन
वाहनचालकांनी लसीकरण करून घ्यावे; 10 एप्रिलपासून कोरोना निगेटिव्ह चाचणीचे 15 दिवसांसाठी वैध असलेले प्रमाणपत्र सोबत बागळणे आवश्यक
टेस्टचे प्रमाणपत्रशिवाय व लसीकरण न करता वाहन चालविणाऱ्याला एक हजारांचा दंड
विद्युत सेवा, टेलिफोन सेवा, विमा, मेडिक्लेम, औषध उत्पादन व्यवस्थापन, वितरण कंपन्यांना सवलत
सरकारी कार्यालयात 50 टक्के उपस्थितीचे बंधन; विद्युत, पाणीपुरवठा, बॅंकिंग, फायनान्ससंदर्भातील सर्व सरकारी कार्यालये, कंपन्या पूर्ण क्षमतेने सुरु राहतील
सर्व कार्यालयांनी तत्काळ ई-व्हिजिटर प्रणाली कार्यान्वित करून घ्यावी; सरकारी कार्यालयात येणाऱ्या गरजूंना मागील 48 तासांतील कोरोना रिपोर्टचे प्रमाणपत्र बंधनकारक
खासगी बससह खासगी वाहतूक सोमवार ते शुक्रवार सकाळी सात ते रात्री आठपर्यंत चालू राहील; खासगी बससेवेच्या चालकांनी लसीकरण करून घ्यावे, तोवर त्यांच्याकडे कोरोना टेस्टचे प्रमाणपत्र बंधनकारक
आदेशातील ठळक बाबी…

सिनेमा हॉल, नाट्यगृहे, सभागृहे, मनोरंजन पार्क, वॉटर पार्क पूर्णपणे बंद राहतील; मोठ्या प्रमाणावर कलाकार एकत्र येऊन चित्रीकरणास बंदी
हॉटेलमधील आवारात वास्तव्यास असलेल्या प्रवाशांसाठीचे रेस्टॉरंट, बार वगळता सर्व रेस्टॉरंट, बार बंद राहील
हॉटेलमध्ये होम डिलेव्हरी, पार्सल सेवा सकाळी सात ते रात्री आठपर्यंत सुरु राहील; होम डिलेव्हरी करणाऱ्यांना लसीकरणाची सक्ती; तोवर कोरोना निगेटिव्हचे प्रमाणपत्र बंधनकारक
10 एप्रिलनंतर नियमांचे उल्लंघन करणाऱ्या घरपोच सेवा देणाऱ्या कामगारांना प्रत्येकी एक हजारांचा तर संबंधित आस्थापनाला दहा हजारांचा आकारला जाईल दंड
धार्मिक पूजा विधीची स्थळे बंद राहणार; नित्योपचार चालू राहतील परंतु, बाहेरील व्यक्तींना बंदी
केस कर्तनालय, सलून, स्पा, ब्युर्टी पार्लरची दुकाने बंद राहतील; या व्यवसायावर अवलंबून व्यक्तींना लसीकरणाची सक्ती
वृत्तपत्र छपाई, वितरण चालू राहील; सकाळी सात ते आठ या वेळेत वृत्तपत्र घरपोच करण्यास परवानगी
वृत्तपत्र वितरकांना कोविड चाचणीचे प्रमाणपत्र बंधनकारक तर लसीकरणाचीही सक्ती; 10 एप्रिलपासून अंमलबजावणी
शाळा-महाविद्यालये बंद राहतील; दहावी-बारावीच्या परीक्षांना सवलत; नियुक्त पर्यवेक्षक, कर्मचाऱ्यांना लसीकरण बंधनकारक
महाराष्ट्राबाहेरील विद्यापीठ, बोर्ड, अन्य प्राधिकाऱ्यांकडून घेतल्या जाणाऱ्या परीक्षांसाठी महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यास असेल परवानगी
सर्व खासगी क्लासेस बंद राहतील; त्यावर अवलंबून शिक्षक, कर्मचाऱ्यांना लसीकरण सक्तीचे
निवडणूक असलेल्या भागातील कार्यक्रमांना जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी बंधनकारक; बंदिस्त कार्यक्रमासाठी 50 पेक्षा अधिक व्यक्तींना परवानगी नाहीच
मेळाव्याच्या ठिकाणी नियमांचे पालन होत असल्याची केली जाणार खात्री; नियमांचे उल्लंघन झाल्यास पुन्हा मिळणार नाही परवानगी
विवाहासाठी 50 व्यक्तींची मर्यादा; विवाहाला उपस्थित व्यक्तींकडे कोरोना निगेटिव्हचे प्रमाणपत्र बंधनकारक, अन्यथा प्रत्येकी एक हजारांचा दंड
अंत्यविधीसाठी 20 व्यक्तींना परवानगी; उपस्थितांनाही कोरोना चाचणीच्या प्रमाणपत्राचे बंधन
रस्त्यालगत खाद्य विक्रीस बंदी; पार्सल, घरपोच विक्रीस सकाळी सात ते रात्री आठपर्यंत परवानगी; मात्र, त्यांच्याकडे कोराना चाचणीचे असावे प्रमाणपत्र
उद्योगातील कर्मचाऱ्यांचे तापमान नियमित मोजावे; सर्वांचे लसीकरण करून घ्यावे, पाचशेहून अधिक कामगार असलेल्यांनी स्वत:चे अलकीकरण सुविधा निर्माण करावी
कामगार पॉझिटिव्ह आल्यास त्याला पगारी रजा द्यावी; कामावरून काढून टाकू नये
ई-कॉमर्सशी संबंधित व्यक्तींनी लसीकरण करून घ्यावे; त्यांच्याकडे तोवर कोरोना चाचणीचे प्रमाणपत्र असावे
गृहनिर्माण सोसायटीतील पाचपेक्षा अधिक रुग्ण आढळल्यास, प्रतिबंधित क्षेत्रात त्याची नोंद घ्यावी; परवानगीशिवाय कोणालाही बाहेर जात येणार नाही
बांधकामाच्या ठिकाणी राहण्यास कामगारांना परवानगी; त्यांनीही लसीकरण करून घ्यावे, तोवर कोरोना चाचणीचे प्रमाणपत्र बंधनकारक