सकल मराठा समाजाची मागणी सारथी सक्षम करा
ग्लोबल न्यूज: छत्रपती शाहू महाराज प्रशिक्षण संशोधन व मानव विकास संस्था अर्थात सारथी संस्था ही मराठा समाजासाठी खंबीरपणे उभी होती. मात्र प्रसकीय अधिकाऱ्यांच्या कामचुकार वृत्तीमुळे आणि चुकीच्या कामकाजाच्या पद्धतीमुळे संस्थेला खीळ बसली होती. जानेवारी महिन्यात पुकारण्यात आलेल्या आंदोलनात मुख्यमंत्री ठाकरे यांच्या वतीने मंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट देऊन अश्वासन सुद्धा दिले होते मात्र सहा महिने गेले तरी अदयाप शासनाने दिलेल्या आश्वासनच त्यांनाच विसर पडला आहे.

तीन कोटी पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या मराठा समाजातील गरीब व होतकरू विद्यार्थ्यांची होणारी गळचेपी व संस्थेचे हालत पाहन समाजात मोठ्या प्रमाणात असंतोष खदखदत आहे. त्यामुळे मराठी समाजातील होतकरून तरुणांचा विहंकार करून आमच्या खालील मागण्याची दखल घ्यावी असे निवेदन सकल मराठा समाजाने मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांना आज सकाळी कोल्हापुरात दिले.

बार्टी संस्थेप्रमाणे असणारी सारथी संस्थेची स्वायतत्ता खंडित होऊ नये. राजर्षी छत्रपती शाहू चे सारथी संस्था जिवत स्मारक असून त्याचे काम पूर्वीप्रमाणे सुरू होऊन ती टिकली पाहिजे. सक्षम कार्यरत सारथी संस्थेत ७५ कर्मचारी कार्यरत होते पण सध्या फक्त ९ कर्मचारी कार्यरत असून यामध्ये इायव्हर व शिपाई यांचा समावेश आहे. त्यामुळे पुरेसे मनुष्यबळ व निधी द्यावा तसेच पाच कोटी निधी परत का गेला याची चौकशी व्हावी अशी मागणी या निवेदनात करण्यात आलेली आहे.
यावर पुण्यात पत्रकारांशी बोलताना वडेट्टीवार म्हणाले की,सध्या करोनामुळे राज्य सरकार आर्थिक अडचणीत असून ‘सारथी’ संस्थेलाही याचा फटका बसत आहे. केंद्राकडून अद्यापपर्यंत निधी आलेला नाही. त्यामुळे अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे. केंद्राकडून निधी येताच तो तातडीने ‘सारथी’कडे वर्ग केला जाईल, ही संस्था आम्ही बंद पडू देणार नाही, अशी ग्वाही राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.