बार्शीत भर दिवसा माजी नगरसेविकेचे घर फोडुन तिन लाखांचे दागिणे लंपास

0
208

बार्शीत भर दिवसा माजी नगरसेविकेचे घर फोडुन तिन लाखांचे दागिणे लंपास

बार्शी: घरात कोणी नसल्याची संधी साधुन घराचा कडी कोयंडा तोडुन घरात प्रवेश करून बेडरूममधील तिन लाख रूपयांचे दागिणे भर दिवसा लंपास केल्याचा प्रकार बार्शी शहरातील सन्मित्र हौसिंग सोसायटी श्रीकृष्ण मंदिरजवळ, अलिपुर रोड येथे घडला.यावरून बार्शी शहरात चोरीची मालिका सुरूच आहे हे सिद्ध झाले आहे.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

The house of a former corporator was vandalized during the day in Barshi

सिध्देश्वर  मेनकुदळे वय 52 रा.
सन्मित्र हौसिंग सोसायटी श्रीकृष्ण मंदिरजवळ, अलिपुर रोड बार्शी यांनी याबाबत बार्शी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
  
दहाच्या सुमारास पत्नी संगितामेनकुदळे मुलगी निशिगंधा कामगौडा असे सर्वजण दुसरी मुलगी कल्याणी मिसाळ रा गाडेगाव रोड बार्शी हिचेकडे भेटणेकरीता गेले होते. त्यानंतर काम असलेने फिर्यादी हे एकटेच 12/30 च्या सुमारास घरी येवुन घरातील कागदपत्रे घेवुन तहसील कार्यालय बार्शी येथे गेले. जाताना मुख्यदरवाज्यास कुलुप
लावुन गेले. तहसील मधील काम उरकल्यावर मुलगी कल्याणी हीचेकडे गेले व पत्नी मुलाबाळासह सायंकाळी सातच्या सुमारास  घरी आले. त्यावेळी  घराचे मुख्य दरवाज्याचा कडी कोयंडा तुटलेला होता व दरवाजा उघडा दिसला.

यामुळे  सर्वानी घरात जावुन पाहीले असता घरातील बेडरूम मध्ये असलेले लोखंडी कपाट व
लाकडी फर्निचर कपाट उघडे होते. व त्यातील साहीत्य फरशीवर व कठड्यावर आस्थाव्यास्त पडलेले दिसले.
   
फर्निचरच्या कपाटामध्ये ठेवलेले सोन्याचे दागीने, चांदीचे ब्रेसलेट व इतर कागदत्र  कपाटात दिसुन आले नाहीत. यामुळे  खात्री झाली की आम्ही घरामध्ये नसताना कोनीतरी अज्ञात चोरटयाने दरावाज्याचा कडी कोयडा तोडुन घरामध्ये येवुन चोरी केलेली आहे.

चोरट्यांनी लाॅकेट,अंगठ्या, सोन्याची चेन,मणी मंगळसूत्र, नथ,ब्रेसलेट, असा तब्बल 297500/- असे  दागीणे व लाॅकरची चावी चेकबुक पासबुक  अज्ञात चोरट्याने चोरून नेले आहे.याबाबत अज्ञात चोरट्याविरुध्द चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अधिक तपास पोलीस करीत आहेत.

Best IT Comany In Maharashtra , Solapur

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here