पैशासाठी डॉक्टर पत्नीचा छळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल; बंदुकीचा दाखविला धाक

0
229

पैशासाठी डॉक्टर पत्नीचा छळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल; बंदुकीचा दाखविला धाक

बार्शी :  पैशासाठी डॉक्टर पत्नीचा छळ केल्याप्रकरणी अक्षयकुमार अरुण अडाले ( पती), अरुण निवृत्ती अडाले (सासरा) (दोघे रा. भुतवाडा रोड, जामखेड जि.अहमदनगर) यांच्याविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत सौ. हर्षदा अक्षयकुमार अडाले हल्ली (रा. उपळाई रोड, क्रांतीसिंह नगर, बार्शी ) यांनी फिर्याद दिली आहे.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा


हर्षदा यांचे सन 2017 साली अक्षयकुमार यांच्यासोबत लग्न झाले. त्यांना दोन मुले आहेत. लग्नात वरदक्षिणा म्हणून दोन लाख रुपये रोख रक्कम व पंधरा तोळे सोने तसेच इतर संसारोपयोगी साहित्य, कपाट, फ्रिज, दिवाण व इतर साहित्य दिले होते.

लग्नानंतर एक वर्ष त्यांना व्यवस्थित नांदविले. त्यानंतर सासरे अरुण त्यांना प्रकृतीवरुन तू डॉक्टर असून तुझ्या अंगात नुसती हाडेच दिसतात, तुला घरातील कामे व स्वयंपाक व्यवस्थित करता येत नाहीत, तु वाळली कशी आहेस असे  म्हणून सतत टोमणे मारुन सतत मानसिक त्रास देवु लागले.

सासरे स्वत:चे क्लिनिक टाकण्यासाठी व नविन घराचे कर्ज फेडण्यासाठी माहेरहून पैसे आण असे म्हणून वारंवार मानसिक छळ करुन मारहाण करत होते. त्यावेळी फिर्यादीने त्यांना उलट प्रतिउत्तर केले की घरातील बंदुकीचा धाक दाखवून तुला खल्लास करीन, अशी धमकी देत होते.

फिर्यादीला वडिलांनी लग्नात घातलेले सोन्याचे दागिने काढून घेतले. त्यानंतर त्यांचे आई वडिल व भाऊ प्रविण वराळे असे 22 नोव्हेंबर 2021 रोजी भांडणतंटा मिटवण्यासाठी आल्यानंतर पती व सासरे यांनी शिवीगाळ करुन मारहाण, दमदाटी केली.


त्यामुळे फिर्यादी आई वडिलांसोबत माहेरी आल्या. वेळोवेळी समजावून सांगूनही पती व सासरे यांचे वागण्यात काहीएक फरक पडत नसल्यामुळे शारीरिक व मानसिक त्रास असह्य झाल्याने त्यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे.

Best IT Comany In Maharashtra , Solapur

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here