केवळ दोनच नव्हे तर सर्वच तालुक्यातील पंचनामे करा-आमदार राजाभाऊ राऊतांची सीएम-डिसीएम कडे मागणी
बार्शी : तालुक्यातील १० ऑगस्टपर्यंत २४४ मिमी
पावसाची सरासरी असते. परंतु ४१४ मिमि (162 टक्के) पाऊस झाला आहे.सततच्या पावसामुळे सोयाबीन, उडीद, मूग, कांदा व बाजरी या पिकांचे मोठ्या प्रमाणात
नुकसान झाले आहे. तालुक्यातील केवळ दोनच मंडळ नव्हे तर सर्वच दहा मंडळातील नुकसानीचे पंचनामे करून मदत द्यावी अशी मागणी आमदार राजेंद्र राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

आमदर राऊत यांनी आज मुंबईत या दोघाची भेट घेतली. तालुक्यात एकूण १० मंडल असून २ मंडलामध्ये ६७ मिमि आणि ८६ मिमि पाऊस झाला म्हणून दोन मंडलाचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत.
एकाच
दिवशीचा अतिवृष्टीचा निकष न पाहता सततच्या पावसामुळे संपूर्ण तालुक्यातील पिकांचे नुकसान झालेले आहे.तरी नुकसान भरपाई मिळणेकरिता संपूर्ण बार्शी तालुक्यातील पिकांचे पंचनामे करण्याचे
आदेश द्यावेत अशी मागणी आमदार राजेंद्र राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.