मी जसं तुमचं ऐकलं तसं तुम्हीही माझं ऐकायलाच हवं ना ! चाळीशीतील वावटळ ,भाग 2

0
986

मी जसं तुमचं ऐकलं तसं तुम्हीही माझं ऐकायलाच हवं ना ! चाळीशीतील वावटळ ,भाग 2

क्लासमध्ये येताच पंकज म्हणाला की चला मुलींनो आपण शिकूया…! तेव्हा बायकांमध्ये एकच हशा पसरला.आम्ही काय मुली आहोत का? कूणीतरी बोललं. तेव्हा तो मिश्कीलपणे म्हणाला,की तुम्ही माझ्या वर्गात आहात आणि मी तुम्हाला शिकवतोय म्हणजे तुम्ही मुलीच आहात आणि असंही मनाने तरूण असावं हो! त्याच्या या बोलण्याने सगळेच एकदम फ्रेश झाले. तिलाही अचानकच आतून एकदमच उत्साही वाटू लागलं.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

मनावरचं मळभ आणि मरगळ दूर झाल्यासारखं..!

तो हुशारही वाटत होता, सगळ्या कंसेप्ट व्यवस्थित समजावून सांगत होता. तिलाही इंटरेस्ट वाटू लागला शिकण्यात. ती त्याच्याशी कामाशिवाय फारसं बोलत नसे;अघळ पघळ तर मुळीच नाही.मात्र बरेचदा बाईक वरून येतांना दिसला की त्याला पाहून तिच्या हृदयाचा ठोका चूकत असे. खूप मॅनली वाटे तो तिला बाईकवर पण असले विचार मनात आले की ती लगेच झटकून टाके! आपण एका मोठ्या मुलाची आई आहोत आणि हे विचार करायचं आपलं आता वय नाही हे ती हजारदा घोकत असे.पण मन ते मनच शेवटी!

हल्ली ती खूपच फ्रेश फील करू लागली होती उगीचच! रोहीतलाही आईमधला हा फरक जाणवत होता.आई आता जास्त फ्रेश असते असे त्याला वाटू लागले. राकेशला मात्र काहीच फरक पडत नव्हता कारण असंही त्याचं तिच्याकडे फारसं लक्ष नसे. त्याच्या दृष्टीने एकच महत्वाचं होत की ती कूठेतरी बिझी आहे ना मग बरंय! दोन चार महिन्यातून तो तिला जवळ घेत असे आणि सगळा कार्यक्रम एकदाचा पार पाडत असे.

तसं त्याने एक दिवशी त्याचा कार्यक्रम आटपला पण सरीताचं काही मन लागेना; काही इच्छाच होईना तिची त्याच्याबरोबर. मग रागवून राकेशनेही नाद सोडून दिला.काहीही नाटकं असतात तुझी, किती भाव खातेस तो पुटपुटला..! पण तिचं लक्षच नव्हतं त्याच्याकडे, तिला आश्चर्य आणि भिती या गोष्टीची वाटत होती की तिला सारखा सारखा पंकज का आठवतोय!

शी! शी! हे काही चांगलं नाही,हे काही खरं नाही, अभ्यासात मन लावायला हवं असं ती उगाचच स्वतः मनाला समजावत बसायची.अशातच क्लासमध्ये सगळ्या बायकांनी ठरवलं की साडी नेसून एकदिवशी सगळ्यांनी क्लासला यायचं.साडी डे सेलिब्रेट करायचा सगळ्या बायकांनी ठरवलं.तेवढीच गंमत आणी चेंज जरासा. फोटोस वगैरे बायका म्हणल्यावर या गोष्टी गृहीतच धराव्या लागतात.तिलाही सगळ्यांनी बजावून सांगितलं की साडी नेसून यायची आणि थोडासा मेकपही चालेल कारण सगळ्यांना गृप फोटोही काढायचे होते.

तिने घरी येऊन सगळ्या साड्या कपाटातून काढल्या, त्यातली पांढरी सोबर साडी सिलेक्ट केली.त्यावर मॅचिंग ब्लॉउज आणि परकर शोधला. कानात मोत्याचे डूल आणि मोत्याचाच साधा सर! दूसर्या दिवशी तीने छान केस धूतले एक बर्यापैकी फेसपॅक लावला. साडी नेसली,ब्लाऊज जरा घट्ट वाटला तिला मग आपण जाड होत चाललोत का? वजन कमी करायला हवं असं काहीसं ती स्वतःलाच पुटपुटली.

तिने मग लागलीच दाट काळ्याभोर केसांची लांबसडक वेणी घातली, डूल,सर घातली आणि बारीक काजळाची रेघ ओढली.आरशात पाहून स्वतःचं हे मनमोहक नजारा पाहून ती स्वतावरच खूष झाली आणि सगळं आवरून क्लासमधे आली.

सगळ्या बायकांनी तिच्या केसांचं,साडीचं खूप कौतुक केलं.एवढ्यात पंकज क्लासमधे शिरला आणि पाहतच राहीला तिच्याकडे! साडीत किती वेगळी दिसत होती ती…थोडीशी भरलेली,गोरीपान गुबगुबीत ! तिची भरदार छाती, पोटाला पडणार्या जीवघेण्या सुंदर घड्या, वळणदार काहीसं स्थूल शरीर…!

त्याने मनाला आवर घालत शिकवायचा प्रयत्न करू लागला.पण त्याचं लक्ष सारखं तिच्याकडेच जाई. किती सेक्सी आहे ही, इतके दिवस का आपल्याला जाणवलं नाही.एकदा तरी तिच्या मऊ पोटाला चिमटा घेऊन पहावा असं त्याच्या मनात आलं आणि त्याने जीभ चावली!????

तोच वर्गात हशा पिकला आणि तो भानावर आला की सगळ्याजणी त्याच्याकडेच पहातायत..!
छे ! छे! हे काही खरं नाही असं म्हणत त्याने शिकवणं आवरतं घेतलं.क्लास संपल्यावर सगळ्याजणी गृप फोटोसाठी उभ्या राहील्या.एवढ्यात पंकजला पण कोणीतरी ओढून आणत सर तुम्ही पण या असं म्हणलं आणि नेमकं सरिताशेजारी उभं केलं. तिला त्याच्याखेटून उभेराहून अचानक त्याच्या बळकट, कमावलेल्या शरीराची ऊब जाणवली आणि तो मंद सुवास.. आहाहा..!

तो पण पहिल्यांदाच असं कोणा बाईला इतकं खेटून ऊभा राहिला होता.तिचा ओझरता स्पर्शही त्याला हवाहवासा वाटत होता.तिला खेचून आपल्या मिठीत घ्यावं अशी अनावर इच्छा झाली त्याला. हे फोटो सेशन कधीच संपू नये असं वाटत होतं त्याला पण फोटो काढून झाले आणि तो लगेच भानावर आला. नाइलाजाने त्याला तिच्यापासून दूर व्हावं लागलं.एवढ्यात मोठ्याने ढग वाजण्याचा आवाज आला आणि त्या पाठोपाठ विजांचा कडकडाट! थोड्याच वेळात मुसळधार पाऊस सुरू झालाही.अवेळी आलेल्या अशा पावसाने सगळ्यांचीच फजिती झाली.

पाऊस बेहोश होऊन कोसळत होता; त्याची थांबण्याची काही चिन्हं दिसेनात. बाहेर जोरदार पाऊस कोसळत होता जोरदार वारे वावटळ…! चक्राकार फिरणारे वारे जे आपल्या बरोबर सगळंच घेऊन जातात…!

घरी जाणं तर भागच होतं सगळ्यांना पण पाऊस काही थांबायला तयार नव्हता. ज्याला जसं जमेल तसं जो तो घरी निघण्याची तयारी करू लागला.सरीतालाही प्रश्नं पडला की घरी कसं जावं? राकेश तर दूर कंपनीत.त्यामुळे तो तर काही घ्यायला येऊ शकणार नव्हता.आणि चालत जायचं तर भिजण्याशिवाय गत्यंतर नव्हतं कारण तिने छत्री आणलेली नव्हती. आणि या मुसळधार पावसात रिक्षा मिळणं मुश्कील होतं.

म्हणून मग तिने नाइलाजाने निघण्याची तयारी केली. एवढ्यात पंकजचं लक्ष तिच्याकडे गेलं आणि एवढ्या पावसात कसं जाणार तुम्ही त्यापेक्षा मी तुम्हाला घरापर्यंत सोडून देतो असं तो म्हणाला! तिला संकोच वाटला. उगाच माझ्यामुळे तुम्हाला त्रास कशाला? जाईन की मी असं म्हणत तिने नकार दिला. त्यात त्रास कसला..! अहो माझं घरही त्याच रस्त्याला आहे. त्या निमित्ताने तुमचं घर पहाणं होईल आणि फारच त्रास देताय तुम्ही मला असं वाटत असेल तर भरपाई म्हणून एक कप चहा द्या मला मग तर झालं तो मिश्कीलपणे तिला म्हणाला. आता मात्र तिला त्याला नकारणं अवघड झालं. आणि दोघंही बाईकवर निघाली.

बाहेर पाऊस वेड्यासारखा कोसळत होता तिला त्याच्या मागे बाईकवर बसण्याचा आधी संकोच वाटला पण मग त्याशिवाय गत्यंतरच नव्हते.ती हलकेच सिटवर बसली काहीसं अंतर राखून. त्यावर तो म्हणला की मला पकडून बसलात तरी चालेल. पडायचंय का तुम्हाला खाली..? रस्ते पाहीलेत ना किती निसरडे आहेत. मग तिने नाइलाजाने त्याच्या कंबरेला हाताने धरले.पाऊस धुवांधार कोसळतच होता गार वारं आणि ती दोघंही चिंब भिजलेली!

क्षणभर तिला वाटलं की याला असंच बिलगून बसावं.आणि हा प्रवास कधीच संपू नये. गाडी पण किती छान चालवतो हा अगदी हळूवार! सगळे खड्डे टाळत.!एवढ्यात तिचं घर आलंच. तिची साडी आणि त्याचे कपडेही पाण्याने चिंब ओले झाले होते. ती पटकन गाडीवरून उतरली. पांढर्या ओल्या साडीत ती आणखीनच सेक्सी वाटली त्याला.पण त्याने तो विचार लगेच झटकून टाकला. तीने थँक्यू म्हणत त्याचे आभार मानले. तोही इट्स ओके म्हणून जायला वळला, तेवढ्यात ती त्याला म्हणली की सर याला काय अर्थय?मी जसं तुमचं ऐकलं तसं तुम्हीही माझं ऐकायलाच हवं ना !

तुम्हाला दिलेल्या त्रासाची भरपाई द्यायला नको का? एक कप चहा तरी घ्यायलाच हवा तुम्ही! शिवाय किती ओले झालात. टॉवेल ने थोडे कोरडे व्हा आणि मग जा. त्याला ही मग नकार नाही देता आला!

क्रमश…
( चाळिशीतील वावटळ – भाग 2)

प्रसाद ????

Best IT Comany In Maharashtra , Solapur

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here