पंढरपूर – शनिवार 15 आँगस्ट रोजी सायं. 6 वाजता उजनी धरणात दौंडजवळून मिसळणारी आवक 20 हजार 184 क्युसेक इतकी होती. पुणे बंडगार्डनचा विसर्ग वाढून तो 26 हजार क्युसेक झाला आहे. याचा फायदा उजनीला होईल. हा प्रकल्प टक्केवारीत चाळीशीच्या उंबरठ्यावर आहे.

मुळा मुठा नदी परिसरात पडणारा पाऊस तेथील साखळी धरणांची पाणी पातळी वाढवत आहे. खडकवासला धरणातून सोडलेले पाणी व पुणे परिसरातील पावसाने बंडगार्डन विसर्ग 26 हजार क्युसेक इतका झाला आहे. याचा फायदा उजनीला होत आहे.
आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

उजनी धरण पाणी पातळी
दि :15/08/20 सायंकाळी 6 वाजता
पाणी पातळी : 493.720मी.
एकूण साठा : 2405 दलघमी
उपयुक्त साठा : 602.82 दलघमी
टक्केवारी : 39.74%
बंडगार्डन विसर्ग : 26021 क्युसेक
दौंड विसर्ग : 20184 क्युसेक