पार्थ आराध्ये
पंढरपूर– उजनी धरण 110.59 टक्के भरले असून वरील काही धरणांमधून पाणी सोडले जात असल्याने या प्रकल्पातून रविवारी दुपारपासून भीमा नदीच्या पात्रात 30 हजार क्युसेकने पाणी सोडले जात आहे. वीज निर्मितीसाठी 1600 क्युसेकचा विसर्ग असल्याने नदीत एकूण 31600 क्युसेक पाणी नदीत येत आहे. दरम्यान संगम येथे भीमा 29800 क्युसेकने वाहात आहे.

उजनी धरणात जास्तीत जास्त 111.28 टक्के पाणीसाठा केला जावू शकतो. सध्या 110.59 टक्के पाणीसाठा झालेला आहे. याची क्षमता 123.28 टी.एम.सी असून यात उपयुक्त पाणीसाठा 59.62 टीएमसी इतका साठू शकतो. सध्या भीमा खोऱ्यातील बहुतांश प्रकल्प भरत आले आहेत. खडकवालसा धरणातून दुपारी 7 हजार तर घोडमधून 3 हजार क्युसेकचा विसर्ग सोडला जात होता.
खडकवासल्यातून पाणी सोडल्याने बंडगार्डनचा विसर्ग वाढणार आहे हे पाहता उजनी धरणातून पुढे भीमा नदीत 30 हजार क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे. सोमवारी सकाळी हा विसर्ग 25 हजार क्युसेक करण्यात आला होता. सध्या 0.53 मीटरने सोळा दरवाजे उघडण्यात आले आहेत.


दरम्यान दुपारी वीर धरणातून नीरा नदीत पाच हजार क्युसेकने पाणी सोडले जात होते. यामुळे भीमेची पाणी पातळी संगमच्या पुढे वाढणार आहे. सध्याच भीमा जिल्ह्यात दुथडी भरून वाहात आहे.
उजनीची पाणी पातळी
पाणी पातळी 497. 311 मीटर
एकूण पाणीसाठा 3480. 72 दलघन मीटर
122.89 टीएमसी
उपयुक्त साठा 1677. 91 दलघन मीटर
59.43 टीएमसी
टक्केवारी 110. 59 %
धरणात येणारा विसर्ग……….
दौंड विसर्ग – 12888 क्युसेक
बंडगार्डन -7207 क्युसेक
धरणातून सोडले जाणा विसर्ग
कालवा- 2450 क्युसेक्स
सीना माढा सिंचन योजना-240 क्युसेक
दहीगाव सिंचन योजना -105 क्यु.
धरणाचे 16 गेट मधून -25000 क्यु.
भीमा- सीना बोगदा – 1000 क्यु.
वीजनिर्मिती -1600क्युसेक