गणेश भक्तांची निराशा, यंदा लालबागच्या राजाचे दर्शन नाही, मंडळाचा निर्णय
कोरोनाच्या वाढत्या संकटात यंदा गणेशोत्सव अत्यन्त सध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बरोबर झालेल्या गणेशोत्सव मंडळांच्या बैठकीत घेण्यात आला होता.


राज्यावर कोरोना या संसर्ग आजाराचे गहिरे संकट उभे राहिलेले असताना यंदाच्या वेळी गणेश मूर्तीची उंचीही कमी करण्यात आली आहे असा सुद्धा निर्णय या बैठकीत घेण्यात आला होता.
आता त्या पाठोपाठ संपूर्ण राज्यात नाही तर देशात प्रसिद्ध असलेल्या लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने यंदा हा उत्सव साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. या बाबतची माहिती एएनआय या वृत्त समूहाने ट्विटरद्वारे दिलेली आहे. लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी महाराष्ट्रातून नाही तर इतर राज्यात सुद्धा भक्त येत असतात. मात्र यंदा कोरोनाच्या संकटाने गणेश भक्तांची फार निराशा केली आहे.