मुंबई : दृश्यम, फोर्स, मदारी, लंय भारी अशा सिनेमाचं दिग्दर्शन करणारे निशिकांत कामात यांचं प्रदीर्घ आजाराने निधन झालं आहे, ते ५० वर्षांचे होते. जुलै महिन्यात कावीळ आणि पोट दुखीच्या त्रासामुळे हैदराबाद येथील गचीबोवली स्थित एआयजी इस्पितळात भरती करण्यात आलं. यावेळी त्यांना क्रॉनिक लिव्हर डिजीज आणि अन्य आजारांचं संक्रमण झाल्याचं कळलं होतं. यानंतर त्यांची प्रकृती खालावत गेली आणि त्यांना आयसीयूमध्ये भरती करण्यात आलं होतं. आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.

इस्पितळात गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट, हॅपेटोलॉजिस्ट आणि वरिष्ठ सल्लागारांची टीम त्यांच्यावर उपचार करत होते. त्यांची प्रकृती गंभीर असली तरी स्थिर असल्याचं सांगण्यात आलं होतं. पण कामत यांना झालेल्या आजारवर कोणतेही उपचार नव्हते.

निशिकांत कामत हे बॉलिवूडमधल्या अग्रेसर दिग्दर्शकांपैकी एक होते. अजय देवगणचा ‘दृश्यम’, इफान खानचा ‘मदारी’, जॉन अब्राहमचा ‘फोर्स’ आणि ‘रॉकी हँडसम’ या हिंदी सिनेमांचं त्यांनी दिग्दर्शन केलं आहे. डोंबिवली फास्ट सारख्या दर्जेदार मराठी सिनेमाचं दिग्दर्शन देखील त्यांनी केले आहे. त्याचबरोबर सातच्या आत घरात, डॅडी, भावेश जोशी सिनेमात त्यांनी अभिनय देखील केला आहे. त्यासोबतच रॉकी हँडसम सिनेमात त्यांनी नकारात्मक भूमिका साकारली होती.