डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना सोलापूर शहराध्यक्षपदी कटारे, सचिवपदी लांबतुरे –
सोलापूर : डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना सोलापूर शहराध्यक्षपदी प्रशांत कटारे यांची तर सचिवपदी रामकृष्ण लांबतुरे यांची निवड करण्यात आली आहे.


डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे संस्थापक राजा माने यांच्या अध्यक्षतेखाली सोलापूरच्या शासकीय विश्रामगृहावर आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत सोलापूर शहराचे नवीन पदाधिकारी निवडण्यात आले.
डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या सोलापूर शहर कार्याध्यक्ष पदी परशुराम कोकणे, उपाध्यक्षपदी महेश हणमे यांची निवड करण्यात आली आहे. याप्रसंगी डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष सतीश सावंत, उपाध्यक्ष विजय कोरे, सचिव विनोद ननवरे, राज्य कार्यकारणी सदस्य शिवाजी भोसले यांच्यासह अन्य पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते.