लग्नसमारंभात २० तोळे सोने व १० लाख रुपये वरदक्षिणा देवूनही रुचकर स्वयंपाक येत नसल्याने सासरच्या लोकांनी १५ लाखांची केली मागणी, सातजणां विरुध्द गुन्हा दाखल
बार्शी, प्रतिनिधी : –
तीन वर्षांपूर्वी झालेल्या लग्न सोहळ्यात नवरेवाला ५ तोळ्याची सोनेचे लॉकेट व अंगठी तर मुलीला १५ तोळेचे दागिनेसह १० लाख वरदक्षिणा देवुनही मुलीला दोन महिने व्यवस्थीत नांदवल्यानंतर रुचकर स्वयंपाक करता येत नाही असे म्हणून त्रास देत पतीसह सासरच्या लोकांनी माहेरावरुन पुन्हा धंद्यासाठ १५ लाख रुपयाची मागणी करत मारहाण केल्याप्रकरणी विवाहिता प्रतीक्षा देवेंद्र पारक वय 29 रा. पिंपरी-चिंचवड सध्या रा. भवानी पेठ बार्शी हिने शहर पोलिसात दिलेल्या तक्रारीवरुन सासरच्या सात जणांविरुद्ध गुन्हा नोंद झाला आहे.


पती देवेंद्र सुनिल पारख, सुनिल चेतनकुमार पारख शशिकला सुनिल पारख , चेतन सुनिल पारख,अमृता चेतन पारख (सर्व रा.अंबिका मिनी मार्केट, चिंचवड (थेरगाव) पुणे) तर तृप्ती संदीप बोरा, संदीप बोरा दोघे (रा.सुखसागर नगर, पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित सात आरोपीचे नावे आहे.
फिर्यादीचा विवाह १५ फेब्रुवारी २०१९ रोजी पुणे येथे झाला होता. या लग्नात मुलीच्या वडिलांनी सोने व इतर साहित्य देऊन वरदक्षिणा दिला होता.मुलीस लग्नानंतर दोन महिने व्यवस्थीत नांदवले. मात्र पती व सासरच्या लोकांनी धंद्यासाठी १५ लाख रुपये माहेराहून आणण्यासाठी मुलीकडे तगादा लावला. त्यानंतर तुला स्वयंपाक व्यवस्थित रूचकर करता येत नाही, तिखटमीठ व्यवस्थित घालत नाही या गोष्टीवरून मानसिक त्रास देत होते. तसेच नणंद व नणंदेचा पतीच्या घरी येवुन मला हे दरिद्री तू आम्ही आले की मान खाली घालुन जायचे असे म्हणुन मला छळ करत असे. तसेच नवरा देवेंद्रही भांडण करायचा आणि रात्री वडिलांना फोन करून तुमच्या मुलीला आत्ताच्या आता घरी घेवुन जा मला तिचे तोंड बघायचे नाही,ती दरिद्री आहे जोपर्यंत १५ लाख हुंडा देत नाही तोपर्यंत तुमच्याकडेच ठेवुन घ्या.
दरम्यान फिर्यादीस दिवस गेले दवाखान्याचा व औषधपाण्याची त्यांची तयारी नसल्याने पती, सासरे, सासु, दिर, जाऊ यांनी मला आणखीनच त्रास दयायला सुरवात केली. पती, सासु, सासरे यांनी मला तुझ्या बहिणीकडे जा तुझ्या दवाखान्याचा खर्च आम्हाला झेपत नाही. तु इथे राहु नको. आमचे समोरून निघुन जा असे म्हणुन हाकलुन लावण्याचा प्रयत्न करीत होते. माहेरी आल्यानंतर सिझरिन ऑपरेशन झाले व मुलगा झाला. तेव्हा वडिलांनी सासु सासरे यांना फोन करून सांगितले तेव्हा तुमच्या मुलीला व तिला झालेल्या मुलाला तुमच्यापाशीच ठेवुन घ्या. असे म्हणाले.
त्यांनतरही सासरी बाळाला घेवुन गेल्यानंतर 3 दिवसांनीच नवरा व सासुने मुलीच्या अंगावरील सर्व सोने काढुन घेतले आणि आता आमच काम झाल आता तु माहेरी निघुन जा, पुन्हा आम्हाला तोंड दाखवू नको, नाहीतर तुझे काही खरे नाही अशी धमकी दिली. त्यानंतर माझे वडिलांनी पतीस खुप समजावून सांगितले तेव्हा घरातील सर्व लोकांनी नांदविण्यास नकार दिला. अधिक तपास बार्शी शहर पोलीस करीत आहेत.