बार्शी तालुक्यातील देवगाव येथे भरदिवसा चोरी; 80 हजाराचा ऐवज लंपास

0
210

बार्शी तालुक्यातील देवगाव येथे भरदिवसा चोरी; 80 हजाराचा ऐवज लंपास

बार्शी : दिवसाढवळ्या बंद घराचे कुलूप तोडून चोरट्याने रोख रकमेसह ८० हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला . देवगावमध्ये शुक्रवारी दुपारी ही घटना घडली . याबाबत तालुका पंचायत येथे सेवेत असलेले निखिल दत्तात्रय मांजरे ( वय ३१ , रा . देवगाव ) यांनी तालुका पोलिसात तक्रार दिली असून , भादंवि ३८० व ४५४ प्रमाणे गुन्हा दाखल दाखल झाला आहे .

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

यात कपाटात ठेवलेले रोख २१ हजार रुपये , ३० हजारांचे ५ ग्रॅम सोन्याची झुंबर , २० हजारांचे ५ ग्रॅमच्या लहान मुलाच्या ५ अंगठ्या , ७ हजारांचे चांदीचे पैंजण , करंडा , असा सुमारे ८० हजारांचा ऐवज चोरट्यानी चोरून नेला .

पोलीस सूत्रांनुसार यातील फिर्यादी हे बार्शी तालुका पंचायत येथे ऑपरेटर म्हणून सेवेत असून , १५ दिवसांपूर्वी त्याची पत्नी डिलिव्हरीसाठी माहेरी गेली . या दिवशी त्याची आई गावात नातेवाइकांकडे कार्यक्रमासाठी गेली होती . घरी कोणी नसल्याने वडील घरास कुलूप लावून बार्शीला आले होते . त्याचाच फायदा या घेऊन चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडले आत जाऊन लोखंडी व लाकडी कपाट देवगांव फोडून पळविला कपाट उघडून त्यातील रोख रक्कम व सोन्या चांदीचे दागिने चोरून नेले याबाबत तालुका पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा करून अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदविला असून , तपास हवालदार गोरख भोसले करीत आहेत .

Best IT Comany In Maharashtra , Solapur

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here