बार्शीत धाडसी दरोडा ; घरामध्ये नातवासह झोपलेल्या आजीला सुऱ्याचा धाक दाखवत २१ तोळे सोन्यासह रोख रक्कम पळवली
सुमारे २१ तोळे सोन्याच्या दागिन्यासह चांदीचे दागिने व रोख रक्कम पळविली
एकुण ११ लाख ३४ हजार ६०० रुपयाची चोरीची

बार्शी : गणेश भोळे
घराच्या जिन्यातील लोखंडी ग्रील च्या दरवाजेचे कुलूप तोडून व खिडकीतून बांबूने आतील लावलेली कडी काढून घरामध्ये प्रवेश करत नातवासह झोपलेल्या आजीला सूऱ्याचा धाक दाखवत गोधडीने तोंड दाबून सहा चोरट्यांनी धाडसी दरोडा टाकत सुमारे २१ तोळे सोन्यासह चांदीच्या ऐवज व रोख असे याची एकुण किंमत ११ लाख ३४ हजार ६०० रुपयाची चोरीची घटना सुभाषनगर गौतम मंगल कार्यालयाजवळ दि. ५ फेब्रुवारी २०२१ रोजी मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास घडली.
याबाबत कालिंदा ईश्वर मुंढे (वय ५१ रा.सुभाषनगर गौतम मंगल कार्यालयाजवळ ताडसौंदने रोड बार्शी यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन बार्शी शहर पोलीसात गुन्हा दाखल झाला आहे.


दिलेल्या फिर्यादीत म्हटले की घरातील दोन मुले व दोन सुना शेतातील कामासाठी तांबेवाडी ता.भुम येथे अधुनमधून जात असतात व त्यांचा कामानिमित्त मुक्काम पडला होता. व नातवंडे लहान असल्याने कालिंदा मुंढे या त्याचे समवेत घरीच थांबल्या होत्या त्यानंतर नेहमीप्रमाणे घरातील कामे उरकुन त्या रात्री नातवासह बेडरूममध्ये झोपी गेल्या दरम्यान मध्यरात्री २ वाजण्याच्या सुमारास झोपीत असताना कशाचातरी धक्का लागला जागा आल्याने पाहीले तर रुमची लाईट लागली होती.
व खोलीमध्ये २०ते २५ वयोगटातील जीन्स पॅन्ट जर्किग घातलेले चार इसम उभे होते त्यापैकी एकाच्या हातामध्ये मोठा धारधार सुरा होता तर खोलीच्या दरवाज्याजवळ दांडक्यासह एक जण व खिडकीजवळ एक इसम हातात बांबु घेऊन उभा होता. सदर महिला झोपेतुन उठल्याचे पाहुन यातील जवळ उभारलेल्या एकाने सुरा दाखवुन बेडवर झोपलेल्या स्थितीतच दाबुन दरडावुन ‘ ये आज्जे माल सांग कुठयं ‘ असे विचारले.
त्यावेळी घाबरून ओरडत असताना त्यापैकी एकाने गोधडीने तोंड दाबुन धरले .
त्यानंतर त्या चोरांनी घरातील लोखंडी कपाट उचकटुन लॉकरमध्ये ठेवलेली काळ्या रंगाची सँगमधील दागिने ठेवलेला पितळी डबा घेऊन पळुन गेले. या डब्यात साडेतीन तोळ्याचे लॉकेट ,साडेतीन तोळ्याचे गंठण, १० ग्रॅमच्या दोन अंगठया, ५ ग्रॅमच्या तीन अंगठ्या, साडेतीन तोळ्याचे सोनसाखळी गंठण, २० ग्रॅमचे मीनीगंठण, दिड तोळ्याचे साखळीझुबे, लेडीज अंगठ्या, बोरमाळ मिनी गंठण, बदाम, सोन्याचे मनी , झुबे, आदी सोन्याचा सुमारे २१ तोळे सोने, चांदीचे व रोख रक्कम असलेली सॅग पळवुन नेली.
दरम्यान जाताना आरडाओरड व पाठलाग करू नये यासाठी बाहेरुन खोलीला कडी घातली त्यानंतर ते चोरगेल्याची खात्री करून आरडाओरड करून आजुबाजुच्या शेजाऱ्यांना उठवले शेजारील लोक येऊन फोन करून मुलांना व पोलिसांना कळविले.घटनेचे गांभिर्य पाहता घटनास्थळी पोलिस निरिक्षक संतोष गिरिगोसावी, उपनिभागीय अधिकारी अभिजीत धाराशिवकर, अप्पर पोलीस अधिक्षक अतुल झेंडे यांनी भेट देऊन पाहणी केली.
दरम्यान घटनास्थळी सोलापुर येथील डॉग स्कॉड टिम पाचारण करण्यात आली होती काही अंतरावर माग काढुन डॉग काही अंतरावर जावुन थांबले
घटनेचे गांभिर्य पाहता या घटनेचा तपास स्वतः डिवायएसपी अभिजीत धाराशिवकर हे करित आहेत.