राज्यातील ठाकरे-पवार पॅटर्न भाजपसाठी धोकादायक-संजय काकडे

0
350

ग्लोबल न्यूज – महाराष्ट्रात ठाकरे-पवार पॅटर्न निश्चित झाला आज. मागील 3 महिन्यांपासून जोरदारपणे बैठका सुरू आहेत. यापुढील सर्व निवडणुका शिवसेना – राष्ट्रवादी – काँग्रेस एकत्र लढणार आहेत. त्यांचे जगावाटपही पूर्ण झाले आहे. हा पॅटर्न भाजपसाठी धोकादायक ठरणार असल्याचा इशारा राज्यसभेचे माजी खासदार संजय काकडे यांनी दिला आहे.

काकडे हे भाजपचे सहयोगी माजी खासदार असून, यापूर्वीही त्यांनी अनेक भाकित व्यक्त केली आहेत. 2017 च्या पुणे महापालिका निवडणुकीत काकडे यांनी भाजपचे 98 नगरसेवक निवडून येणार असल्याचा अंदाज व्यक्त केला होता. तेवढेच नगरसेवक निवडून आल्याने अनेकांना जबरदस्त धक्काच बसला होता.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

यापूर्वी शिवसेनेच्या मुखपत्र असलेल्या दैनिक ‘सामना’त राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची मुलाखत छापून आली होती. आगामी विधानसभा निवडणुकीत महाआघाडी एकत्र लढणार असल्याचे जाहीरपणे सांगितले होते. गुरुवारी मुंबईत ठाकरे स्मारकात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात बैठक झाली. त्यामध्ये आगामी निवडणूक सोबत वाढविण्या संदर्भात चर्चा झाल्याची कुजबुज आहे. आमचे सरकार कर्माने गेले, हे सरकारही त्यांच्या कर्माने जाणार आहे. सरकार पाडायला हिंमत लागत नाही, नंबर गेम लागतो.

भाजप – शिवसेना सरकार असताना शिवसेनेचे मंत्री खिश्यात राजीनामे घेऊन फिरायचे, त्याचे आता काय झालं? असा संतप्त सवालही संजय काकडे यांनी उपस्थित केला आहे. ‘ठाकरे-पवार पॅटर्न’ची युती जवळपास निश्चित झाली आहे. राज्यात भाजपला सत्तेपासून दूर ठेवायचे असेल तर शिवसेना व राष्ट्रवादी या दोन पक्षांनी एकत्रच राहायला हवे, यावर दीर्घकाळ चर्चा झाली आहे. केवळ रायगड जिल्हाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात महाविकास आघाडीची एकजूट दिसायला हवी. त्यासाठी आपसात समन्वय असला पाहिजे, असा या चर्चेतला सूर होता.

Best IT Comany In Maharashtra , Solapur

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here