मोहोळ कुंटणखाना प्रकरणी हॉटेल मालक, मॅनेजर, एजंटवर गुन्हा; श्वसनाद्वारे विषबाधेने ११ महिला बेशुध्द
मोहोळ : मोहोळ – पंढरपूर (mohal – Pandharpur) रस्त्यावर तांबोळे पाटीनजीक असणाऱ्या हॉटेल किंग लॉयन (hotel) येथे कुंटणखाना (Brothel) चालविण्याच्या हेतूने आणलेल्या तीन महिलांसह हॉटेल मालक, मॅनेजर व एजंट या तिघावर गुन्हा (crime) दाखल झाल्याची घटना शनिवारी (दि. ८ ) घडली.

मालक विशाल दशरथ शिंदे (रा. बुधवार पेठ, मोहोळ), मॅनेजर प्रमोद जवंजाळ (रा. उपळाई खुर्द, ता. माढा) व एजंट जयप संजय पवार (रा. कुंभारखाणी, मोहोळ) असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. दरम्यान, एजंट (agents) जयपाल पवार यास अटक करून न्यायालयासमोर (court) उभे केले असता ११ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी (police custody) सुनावली आहे.

याबाबत मोहोळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हॉटेल किंग लॉयन येथे बाहेरील महिला आणून वेश्या व्यवसाय (The prostitution business) केला जात असल्याची माहिती (information) पोलीस निरीक्षक (pi) अशोक सायकर यांना मिळाली होती. त्या माहितीनुसार दि. ७ रोजी रात्री उशिरा पोलीस उपनिरीक्षक सुधीर खरगे, पो.ना. प्रवीण साठे, अमोल घोळवे, अनुसया बंडगर या पथकाने बनावट ग्राहक बनवून छापा (raid) टाकला असता हॉटेलच्या खोली क्रमांक १७, १८ व १९ मध्ये बाहेरील मुली ग्राहकांसह अनैतिक मानवी व्यापार (Unethical human trafficking) करताना आढळून आल्या.

त्यामुळे मालक (owners) विशाल शिंदे, मॅनेजर प्रमोद जवंजाळ व एजंट जयपाल पवार यांच्या विरोधात पोलीस उपनिरीक्षक सुधीर खरगे यांनी फिर्याद दिली असून अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध अधिनियम कलमान्वये दाखल झाला आहे.
जयपाल पवार यास अटक ( arrested) करून न्यायालयासमोर उभे केले असता त्यास ११ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.