बार्शी तालुक्यातील कोविड-लसीकरण सुरळीतपणे राबवा- तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी मार्गदर्शक सुचना केल्या जाहीर

0
393

बार्शी तालुक्यातील कोविड-लसीकरण सुरळीतपणे राबवा- तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी मार्गदर्शक सुचना केल्या जाहीर

बार्शी: सध्या बार्शी तालुक्यामध्ये कोविड -19 लसीकरण मोठया प्रमाणावर शहरी व ग्रामीण भागामध्ये राबविण्यात येत आहे. बार्शी तालुक्यास मिळणारे लसीकरणाचे डोस व त्यासाठी होणारी गर्दी त्यामुळे शहरी व ग्रामीण भागामध्ये गोंधळ निर्माण होत आहे. उदा. डोस 100 असतील तर तसीकरण केंद्रावर व्यक्ती 500 आलेल्या असतात, सदर गर्दीमुळे कर्मचारी व लसीकरणाचे डोस घेण्यास येणा-या व्यक्तींना याचा नाहक त्रास होत आहे. तसेच सदर लसीकरण केंद्रावर लस घेण्यासाठी गर्दी होत असल्याने कोविड-19 चा संसर्ग वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोविड -19 लसीकरणामध्ये शहरी व ग्रामीण भागामध्ये सुसुत्रता आणणेसाठी खालील प्रमाणे नियमावली निमित करण्यात येत आहे.त्याची काटेखोर पणे अंमलबजावणी करावी अशा सूचना तालुका आरोग्य अधिकारी डॉ अशोक ढगे यांनी सर्व ग्रामीण रुग्णालयाचे अधिक्षक, प्राथमिक आरोग्य केंद्राचे अधिकारी व सर्व लसीकरण केंद्राच्या प्रमुखांना दिल्या आहेत.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

• प्रत्येक 100 ते 150 लाभार्थ्यांसाठी नोंदणी व पडताळणी करण्यासाठी आपलेकडील उपलब्ध
मनुष्यबळानुसार एक अथवा द्विसदस्यीय टिम तपार करण्यात यावी
• सदर तयार केलेल्या टिम ने लसीकरणासाठी आलेल्या व्यकतींची नोंदणी ही लसीकरणाच्या दिवशी सकाळी 6,00 वाजलेपासुन सुरु करावी.
• सदर लसीकरणाची नोंदणी करतेवेळी लाभार्थ्याचे नाव, गाव, वय, मोबाईल क्रमांक, आधार कार्ड , डोस क्रमांक (पहिला/दुसरा) इ. सर्व माहिती रजिस्टरला नोंदवुन संबंधित लाभार्थ्याला संस्थेच्या सही शिक्कयासह नंबर टाकुन टोकन देण्यात यावे.

• एका व्यक्तीस जास्तीत जास्त 02 अथवा त्याच कुटुंबातील सदस्य असतील तर 4 टोकन देण्यात यावे.
• एकुण लस उपलब्धतेच्या 90 टक्के टोकन वितरीत करण्यात यावे. (उदा. 100 लसीकरणाचे डोस उपलब्ध
असतील तर 10 डोस वेस्टेज गृहित धरुन 90 टोकन वाटप करण्यात यावे

• लसीकरण सत्राच्या शेवटी 10 टक्के वेस्टेज मधील लस शिल्लक असल्यास रांगेतील इतर लाभार्थ्यांना
टोकन वाटप करून उपलब्ध शिल्लक डोसेस प्रमाणे लस देण्यात यावी.

• कोविड-19 लसीकरणाचा दुसरा डोस देय असल्यास ( 45 दिवसांपेक्षा जास्त दिवस झाले असल्यास)
त्यांना प्राधान्याने दुसरा डोस देण्यात यावा,
पहिल्या व दुस-या लसीकरणाच्या डोसच्या रांगा कोविड प्रोटोकॉलचा अवलंब करुन वेगवेगळया करण्यात
याव्यात.

कोविड-19 प्रोटोकॉलनुसार कौविड-19 लसीरकण पुर्ण होईल याची दक्षता घ्यावी,
सदर कोविड लसीकरणे केंद्राकर कायदा व सुव्यवस्थेसाठी संबंधित पोलिस स्टेशनला पत्र देऊन सुरक्षा
रक्षक उपलब्ध करुन घेण्याची जबाबदारी वैदयकीय अधिक्षक/वैदकीय अधिकारी यांची राहिल.

• कोविड-19 लसीकरण पुर्ण झाले तर आवश्यक असलेले सर्व रिपोर्टिंग वेळेत पुर्ण होईल याची जबाबदारी
वैदयकीय अधिक्षक/वेदकीय अधिकारी यांची राहिल. (स्पीड शीट, कोविन अँप इ. वर दैनंदिन माहिती
भरण्या यादी)

  • सर्व लसीकरण हे ऑनलाईन पध्दतीनेच होतील याची दक्षता घेण्यात यावी
    • कोणत्याही परिस्थितीत टोकन नसलेल्या लाभार्थ्यांना कुठल्याही दबावाला बळी न पडता लस देण्यात येऊ
    नये.
    उपरोक्त नमूद सर्व वैदयकीय अधिक्षक/वैदकीय अधिकारी विनंती आहे की सदर नियमावलीचे
    काटेकोरपणे पालन करावे व लसीकरण केंद्रावर योग्य नियोजन व व्यवस्थापन करावे. वरील नमुद
    केलेल्या नियमावलीप्रमाणे कामकाज होईल याची दक्षता यावी अशा सूचना दिल्या आहेत.

Best IT Comany In Maharashtra , Solapur

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here