कोरोनाच्या नावाखाली महाआघाडीत भ्रष्टाचार सुरु- चंद्रकांतदादा पाटील
सध्या देशपाठोपाठ महाराष्ट्रात सुद्धा कोरोना रुग्नांच्या संख्येत झपाटयाने वाढ होताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याचे राजकारण सुद्धा चांगलेच तापलेले दिसून येत आहे. त्यातच आता भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार आरोप लगावले आहेत.


कोरोना संसर्गाला रोखण्यासाठी राज्यात भाजपा जितके प्रयत्न करत असताना दिसून येते तितके प्रयत्न महाविकास आघाडीचे सरकार करता असताना दिसून येत नाही. कोरोना महामारीविरोधात लढण्यास लागणाऱ्या पीपीई किट, तात्पुरत्या उभा करत असलेल्या कोविड सेंटर, मृतदेहाला लागणाऱ्या बॅगा यात या सरकारने भ्रष्टाचार केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
धारावीत दीडशे रुपयांना पीपीई किट मिळते, ब्रँडेड साडेचारशे मग १३०० रुपयांना किट हे सरकार घेत असून, करोनाच्या नावाखाली भ्रष्टाचार करण्यास मोकळे आहे असेही चंद्रकांत पाटील यावेळी म्हणाले.