CoronaVirus: या आमदारानं धरले चक्क पोलिसांचे पाय ;वाचा सविस्तर-

0
380

अरक्कूचे आमदार चेट्टी फाल्गुना यांनी पोलिसाचे पाय पकडून आभार व्यक्त केले आहेत.

कोरोना युद्धाशी दिवसरात्र २४ लढत आहेत ते आरोग्य अधिकारी, कर्मचारी आणि पोलीस दल.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

हैदराबाद – राजकीय नेते हे पोलिसांचे बाॅस म्हणून ओळखले जातात. पोलिसांना त्यांना सॅल्यूट करावा लागतो. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलिस दल ज्या पद्धतीने काम करते आहे ते पाहून आंध्र प्रदेशच्या एका आमदाराला राहवले नाही. राज्यातील पोलिसांनी लाॅक डाऊन  यशस्वी केल्याबद्दल या आमदाराने एका सहायक फौजदाराचे पाय धरले. पोलिसांच्या प्रति आदर व्यक्त करण्यासाठी आपण ही कृती करत असल्याचा दावा या आमदाराने केला.

पोलीस आणि आरोग्य विभागावर गेल्या महिनाभरापासून कामाचा प्रचंड ताण आहे. पोलिसांच्या सर्व सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यांच्या कामाचं लोकप्रतिनिधी आणि सर्वसामान्य नागरिकांतून तसेच सोशल मीडियावर ही कौतुकही होत असताना विशाखापट्टनम येथील एका आमदाराने चक्क पोलीस अधिकाऱ्यांचेच पाय धरले. कोरोनाच्या लढाईत सैनिकाप्रमाणे लढणाऱ्या पोलिसांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांनी पोलिसांचे पाय धरले.

अरक्कूचे आमदार चेट्टी फाल्गुना यांनी अहोरात्र काम करणाऱ्या पोलिसांचे अनोख्या पद्धतीने आभार मानले आहेत. पोलिसांना देखील आपल्याप्रमाणे कुटुंब आहे. तरीदेखील घर दार सोडून ते कोरोनाविरुद्धची लढाई हिम्मतीने लढत आहेत. त्यांना आपण घरातून बाहेर न पडता १०० टक्के लॉकडाऊन यशस्वी करून कोरोनावर मात करण्यास साथ देणं गरजेचं आहे.

देशातील कोरोना व्हायरसचा धोका दिवसेंदिवस वाढत चालला आहे. कोरोनाचा विळखा आटोक्यात आणायचा असेल तर आपण पोलीस यंत्रणेला साहाय्य करून घरीच बसणं स्वीकारलं पाहिजे. .

Best IT Comany In Maharashtra , Solapur