आमदार राजेंद्र राऊत यांनी घेतली कोरोना लस
बार्शी – आमदार राजेंद्र राऊत यांनी बार्शीतील ग्रामीण रुग्णालयात कोरोना लस घेतली. यावेळी, त्यांनी 60 पेक्षा जास्त वय असलेल्या व वय वर्षे 45 ते 59 वय असलेल्या परंतु मधूमेह, ब्लड प्रेशर व इतर आजार असणा-या नागरिक बंधू-भगिनींना लस घेण्याचे आवाहन केले आहे.
आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा


मी स्वतः कोरोना लस घेतली असून, लस पूर्णपणे सुरक्षित आहे. आपले कुटुंब-आपली जबाबदारी व मी जबाबदार म्हणून आपणही लस घ्यावी असे आवाहन आमदार राजेंद्र राऊत यांनी केले. दरम्यान, बार्शीत लसीकरण मोहीम गतिमान झाली असून नागरिक पुढाकार घेऊन लस टोचून घेत आहेत.