सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात रविवारी 82 जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह; चार मृत्यू

0
383

सोलापूर: आज रविवारी दि.13 डिसेंबर रोजी ग्रामीण भागातील 82 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये 51 पुरुष तर 31 महिलांचा समावेश होतो. आज बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या 85 आहे. यामध्ये पुरुष 58 तर 27 महिलांचा समावेश होतो . आज 4 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे.

आज एकूण 2802 कोरोना अहवाल प्राप्त झाले आहेत त्यापैकी 2720 अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

सोलापूर जिल्ह्यातील आज पर्यंत पॉझिटिव्ह आलेल्या बाधित रुग्णांची संख्या 36 हजार 922 इतकी झाली आहे. यामध्ये 22877 पुरुष तर 14045 महिला आहेत.

या भागांतील मृत्यू…

माळशिरस येथील नातेपुते भागातील 69 वर्षांची पुरुष, तर मोहोळ तालुक्यातील अंकोली गावातील 75 वर्षांचे पुरुष त्याच सोबत अक्कलकोट येथील वागदरी येथील 60 वर्षांचे पुरुष आणि बार्शी येथील रुई भागातील 54 वर्षांचे पुरुष या चौघा जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे मृत्यूचे सत्र कधी थांबणार असा प्रश्न ग्रामीण भागातील नागरिकांमधून विचारला जात आहे.

आज पर्यंत सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात 1085 जणांचा मृत्यू झाला आहे यात 783 पुरुष तर 302 महिलांचा समावेश होतो जिल्ह्यातील ग्रामीण भागात विविध रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाधित रुग्णांची संख्या 1 हजार 104 आहे .यामध्ये 873 पुरुष तर 231 महिलांचा समावेश होतो. आज पर्यंत रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या 34 हजार 733 यामध्ये 21221 पुरुष तर 13512 महिलांचा समावेश होतो.

अक्कलकोट -नागरी 0 तर ग्रामीण 11

बार्शी –नागरी 4 तर ग्रामीण 5

करमाळा –नागरी 1 ग्रामीण 3

माढा – नागरी 3 तर ग्रामीण 5

माळशिरस – नागरी 0 तर ग्रामीण 7

मंगळवेढा – नागरी 0 ग्रामीण 7

मोहोळ – नागरी 1 ग्रामीण 2

उत्तर सोलापूर – नागरी 0 ग्रामीण 0

पंढरपूर – नागरी 3 ग्रामीण 12

सांगोला – नागरी 0 ग्रामीण 4

दक्षिण सोलापूर – नागरी 0 ग्रामीण 0

आजच्या नोंदी नुसार नागरी -12 तर ग्रामीण भागात 70 असे एकूण 82 कोरोना बाधित व्यक्ती आढळून आल्या आहेत.

Best IT Comany In Maharashtra , Solapur

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here