ग्रामीण भागात कोरोनाचा कहर सुरूच: ग्रामीणध्ये 344 तर सोलापूर शहरात 30 अहवाल कोरोना पॉझिटिव्ह

0
737

सोलापूर: सोलापूर महानगरपालिका क्षेत्रामध्ये आज मंगळवारी दुपारी दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी रात्री 12 पर्यंत 526 वैद्यकीय अहवाल प्राप्त झाले .त्यापैकी 496 अहवाल निगेटिव्ह आले असून 30 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यात 15 पुरुष तर 15 महिलांचा समावेश असल्याची माहिती सोलापूर महापालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे.आज 14 बाधित व्यक्ती बऱ्या होऊन घरी गेल्या आहेत.

तर सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातही दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. विशेष म्हणजे मृत्यूचे प्रमाण सुद्धा जास्त दिसून येत आहे.आज बुधवारी  ग्रामीण भागातील तब्बल 344 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

ज्या वेगाने सोलापूर शहर आणि परिसर ग्रीन झोन मधून रेड झोन कडे गेले ,त्याच गतीने नसले तरी हळूहळू कोरोना बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत आहे.मागील पाच ते सहा दिवसात दिवसागणिक बरे होण्याचे प्रमाण वृद्धिंगत होत आहे तर मृत्यु प्रमाण कमी होत असल्याचे दिसत आहे.

आज एक कोरोना बाधित व्यक्तीचा मृत्यू झाला असल्याची माहिती देण्यात आली आहे.पूनम नगर मजरेवाडी येथील ७० वर्षीय पुरूष यांचे १० ऑगस्ट रोजी दुपारी निधन झाले आहे.आज पर्यंत एकूण 384 जणांचा बळी या आजाराने गेला आहे. यामध्ये 255 पुरुष तर 129 महिलांचा समावेश होतो.

आज पर्यंत पॉझिटिव्ह आलेल्या बाधित रुग्णांची संख्या 5550 इतकी झाली आहे, तर आजपर्यंत एकूण 384 जणांचा मृत्यू झाला आहे रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 933 इतकी आहे, तर रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या 4233 इतकी लक्षणीय आहे.

आज जिल्हा प्रशासनाकडून बुधवारी दुपारी ग्रामीण भागातील कोरोना संदर्भातील आकडेवारी प्रसिद्ध करण्यात आली. त्यामध्ये नगरपालिका क्षेत्र वगळण्यात आले होते. रात्री आठच्या दरम्यान नगरपालिका क्षेत्र आणि ग्रामीण भागातील सुधारित आकडेवारी प्रसिद्ध करण्यात आली.

सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. विशेष म्हणजे मृत्यूचे प्रमाण सुद्धा जास्त दिसून येत आहे.आज बुधवारी  ग्रामीण भागातील तब्बल 344 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

यामध्ये 204  पुरुष तर 140 महिलांचा समावेश होतो. आज बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या  128  आहे. आज 10 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे.या मध्ये नगरपरिषद येथील कोरोना रुग्णाचा समावेश नाही .

सोलापूर जिल्ह्यातील आज पर्यंत पॉझिटिव्ह आलेल्या बाधित रुग्णांची संख्या 6531 इतकी झाली आहे. यामध्ये 3919 पुरुष तर 2612 महिला आहेत. यामध्ये एक व्यक्ती पुणे येथे पॉझिटिव्ह आढळून आली आहे तर आज पर्यंत सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात 189 जणांचा मृत्यू झाला आहे.

यात 130 पुरुष तर 59 महिलांचा समावेश होतो जिल्ह्यातील ग्रामीण भागात विविध रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाधित रुग्णांची संख्या 2653 आहे .यामध्ये 1614 पुरुष 1039  महिलांचा समावेश होतो आज पर्यंत रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या 3689 यामध्ये 2175 पुरुष तर 1514 महिलांचा समावेश होतो.

अक्कलकोट 8 बार्शी 65 करमाळा 13  माढा 11  माळशिरस 23 मंगळवेढा 14  मोहोळ 09 उत्तर सोलापूर 15 पंढरपूर 136 सांगोला 31 दक्षिण सोलापूर 19 असे एकूण 344 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.

बार्शी येथील 5 ,अक्कलकोट 1,माळशिरस 2 ,उत्तर सोलापूर 1 सांगोला 1  व्यक्ती मरण पावली आहे.

Best IT Comany In Maharashtra , Solapur

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here