बार्शी तालुक्यात कोरोनाची वाढ सुरूच , ६ पॉझिटिव्ह रुग्णांची भर
बार्शी :बार्शी तालुक्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. रविवार ५जुलै रोजी रात्री उशीरा प्राप्त झालेल्या अहवालपैकी ६ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. यात बार्शी शहरातील ४ तर खांडवी,बाभुळगाव येथील प्रत्येकी १ असा समावेश आहे .
आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

बार्शी शहरासह ग्रामीण भागातील रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत असुन यामुळे नागरीकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. रविवार रोजी आलेल्या अहवालात इंदिरानगर कासारवाडी रोड १, सुतारनेट तानाजी चौक-१, फुले प्लॉट, परंडा रोड -१ ,भवानी पेठ -१ तर ग्रामिण भागातील खांडवी -१ बाभुळगाव -१ असे ६ बाधित रुग्ण आढळले आहे .