बार्शी : येथील श्रीमान भाऊसाहेब झाडबुके महाविद्यालयामध्ये आयक्यूएसी विभागाच्या वतीने बार्शी शिक्षण प्रसारक मंडळाच्या विविध प्राथमिक शाळेतील शिक्षकांसाठी अध्यापन आणि नियोजन या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी बार्शी शिक्षण प्रसारक मंडळाच्या संचालिका वर्षा ठोंबरे होत्या.
कार्यशाळेसाठी तज्ञ साधन व्यक्ती म्हणून महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. मनोज गादेकर आणि आयक्यूएसी चे समन्वयक डॉ. गिरीश काशिद यांनी सहभागी शिक्षकांना मार्गदर्शन केले.

या कार्यशाळेत संस्थेच्या विविध शाखांमधील प्राथमिक शिक्षकांनी लहान वयोगटातील मुलांना नेमके कसे अध्यापन करावे आणि अध्यापनाचे नियोजन कसे करावे या विषयी प्रस्तुतीकरण केले. यावेळी साधन व्यक्तींनी काळानुरूप अध्यापनमध्ये कोणते बदल करणे गरजेचे आहे याविषयी मार्गदर्शन केले. अध्यक्षीय समारोपामध्ये संस्थेच्या संचालिका वर्षा ठोंबरे यांनी नवीन शैक्षणिक धोरण, बदलते शिक्षण प्रवाह आणि मुले याविषयी मार्गदर्शन केले. या कार्यशाळेचे प्रास्ताविक महाविद्यालयातील भौतिकशास्त्र विभागाचे प्रा. चंद्रकांत गायकवाड यांनी केले. याप्रसंगी ममता शाळेचे मुख्याध्यापक किरण तौर, नुतन मराठी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका एस.एस. नलवडे व सराव पाठशाळेच्या मुख्याध्यापिका ए. एस. ढोणे उपस्थित होते.
आभार प्रा. संदीप उबाळे यांनी मानले तर सुत्रसंचलन प्रा. मंगेश कांबळे यांनी केले. कार्यक्रमासाठी डॉ. वैभव वाघमारे, डॉ. विशाल लिंगायत, डॉ. जयसिंग सिंगल, प्रा. शशिकांत मुळे, प्रा. योगीराज घेवारे, प्रा. वजीर मुलाणी, उमेश मदणे, जितेंद्र गाडे यांनी परीश्रम घेतले.