सकाळी सहा वाजताच गाठली महापालिका अन नऊ कामचुकरांना पाठवले घरी

0
409

नागपूर : महानगरपालिकेचे आयुक्त तकाराम मुंढे यांना कर्तव्यात कसूर केलेली अजिबात खपत नाही. तरीसुद्धा काही कर्मचारी त्यांच्याही डोळ्यांत धूळ फेकण्याचे प्रयत्न करतात. त्यामुळे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी (ता. २४) सकाळी ६ वाजताच मनपा मुख्यालय आणि सफाई कर्मचारी हजेरी लावत असलेल्या शेडला आकस्मिक भेट दिली. यात काही कर्मचारी कर्तव्यात कसूर करताना आढळले. अशा नऊ कर्मचाऱ्यांचे तडकाफडकी निलंबन करण्यात आले.त्यांच्या या धडाकेबाज कारवाईने कामचुकारांमध्ये धडकी भरली आहे. 

मुख्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराला लागूनच कोरोना नियंत्रण कक्ष आहे. हा कक्ष 24 तास सुरू असतो. येथे कर्मचाऱ्यांना पाळीमध्ये बोलाविण्यात येते. मात्र रात्र पाळीत असलेले चार कर्मचारी दिलेली जबाबदारी व्यवस्थीतपणे पार पडत नसल्याचे त्यांच्या निर्दशनास आले. कर्तव्यात कसूर केलेल्या किशोर कहाते, मनोज तांगडे, प्रशांत डाहाळ, सुनील लोहकरे यांना तात्काळ प्रभावाने आयुक्तांनी निलंबित केले.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

त्यानंतर त्यांनी मनपातील अटलबिहारी वाजपेयी सिटी ऑपरेशन सेंटरला भेट दिली. तेथून शहरात प्रत्येक झोनमधील सफाई कर्मचारी कर्तव्यावर हजर झाले की नाही, याची पाहणी केली. सर्व सफाई कामगारांना घड्याळी देण्यात आल्या आहेत. त्यावरून प्रत्येक कर्मचारी कुठे आहे, त्याचे ट्रॅकिंग केले जाते. 

मनपा आयुक्तांनी अचानकपणे विविध झोनमधील स्वच्छता निरीक्षकांना फोन लावून उलटतपासणी केली. कोण कुठे आहेत, ते लोकेशन तपासले. यानंतर तेथून पाचपावली, इंदोरा, धरमपेठ अशा काही ठिकाणी हजेरी शेडला भेट दिली. तेथील हजेरी रजिस्टरची तपासणी केली. तेथेही काही स्वच्छता निरीक्षक व अन्य कर्मचारी कर्तव्यात कसूर करताना आढळले.

त्यांनाही तात्काळ निलंबित करण्याचे आदेश दिले. यामध्ये आशीनगर झोनचे स्वच्छता निरीक्षक संजय पोटे, आशिक बनसोड, धरमपेठ झोनचे प्रभारी झोनल आरोग्य अधिकारी जयवंत जाधव, नेहरूनगर झोनचे राजेंद्र सोनटक्के आणि मंगळवारी झोनचे दिनेश करोसिया यांचा समावेश आहे. मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या या आकस्मिक पाहणी दौऱ्यात अतिरिक्त आयुक्त संजय निपाणे आणि घनकचरा व्यवस्थापन उपायुक्त डॉ. प्रदीप दासरवार उपस्थित होते. 

Best IT Comany In Maharashtra , Solapur

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here