आ राऊत यांच्या स्थानिक विकास निधीतून वायकुळे प्लॉट भागात विकासकामाचा प्रारंभ
बार्शी : आमदार राजेंद्र राऊत यांच्या स्थानिक विकास निधीतून शहरातील वायकुळे प्लॉट (प्रभाग क्रमांक १५ ) येथील आरसीसी गटार कामाचा प्रारंभ परिसरातील महिलांच्या हस्ते करण्यात आला. सुमारे २७ लाख रुपये खर्चातून हे काम होणार आहे.
आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा


प्रमिला जगताप, मनीषा मस्तुद,पूजा शिंगाडे, रोहिणी राऊत, शाहीन शेख, सारिका शिंदे,
शितल उलभगत, सविता बाराते, विद्या राऊत, निता कारकर, निता अडसूळ यांच्या हस्ते कामाचा प्रारंभ करण्यात आला.
या भागात लोकवस्ती झाल्यानंतर प्रथमच गटारीचे विकासकाम घेण्यात आले आहे. यावेळी आमदार राजेंद्र राऊत नगराध्यक्ष असिफ तांबोळी, माजी नगराध्यक्ष रमेश पाटील, नगरसेवक मदन गव्हाणे, राजेंद्र पोफळे, नागेश कातुरे, महेश देशमुख रवी अंधारे, काका टेपाळे आदी उपस्थित होते.