येत्या 2 महिन्यात मुंबईत कोरोना येणार नियंत्रणात IIT मुंबईचा दावा…!
सध्या मुंबई कोरोनाच्या वाढत्या संख्येमुळे चिंतेचे वातावरण पसरले आहे. त्यात मृत्यूचे प्रमाणही काही अंशतः वाढलेले दिसून येत आहे. त्यामुळे मुंबई महाराष्ट्राला कोरोनापासन केव्हा मुक्ती मिळणार असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. आता यावर एक दिलासादायक बातमी समोर येत आहे.

IIT मुंबईच्या अहवालात नमूद केल्यानुसार सद्यपरिस्थिती पाहता, मुंबईत येत्या दोन आठवड्यांमध्ये कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव नियंत्रणात येऊ शकतो. तर, महाराष्ट्रात यासाठी जवळपास दोन महिन्यांचा कालावधी लागू शकतो. दिल्लीमध्ये कोरोनाचे सध्याचे प्रमाण पाहता महिन्याभरात येथील परिस्थिती नियंत्रणात असू शकते, असा अंदाज IIT बॉम्बे ने वर्तवला आहे.

यावर मुंबईच्या महापौर किशोरीताई पेडणेकर यांनी दिलेल्या माहिती नुसार , आयआयटीचा हा अहवाल पाहिल्यास मुंबईत कोरोनातून बरे होणाऱ्यांची संख्या ७० टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे.

तर, मृत्यूदरही कमी झाला आहे. याच गतीनं जर कोरोना रुग्णांचे बरं होण्याचं प्रमाण वाढत राहिलं आणि मृत्यूदरात घट होत राहिली तर पुढच्या दोन आठवड्यांत मुंबईतील कोरोना नियंत्रणा येऊ शकतो. असे बोलून दाखवले आहे.