ग्लोबल न्यूज – राज्यात मागील 24 तासात 10 हजार 725 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आजपर्यंत 2 लाख 66 हजार 883 रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात 9 हजार 601 नव्या करोना रुग्णांचे निदान झाले. तर राज्यात 322 करोना बाधितांचा मृत्यू मागील 24 तासांमध्ये झाला आहे.

आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आज राज्यात आज 9,601 नव्या कोरोना बाधितांची नोंद झाली. यासह राज्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या 4,31,719 एवढी झाली आहे.
यापैकी 2 लाख 66 हजार 883 रुग्ण बरे झाले आहेत. सध्या 1 लाख 49 हजार 214 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यापैकी जवळपास 46,345 एवढे रुग्ण फक्त पुण्यात आहेत.


राज्यात आज कोरोनाबाधित 322 रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यातील एकूण मृतांची संख्या 15,316 एवढी झाली आहे. राज्यातील मृत्यू दर 3.55 टक्के झाला आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 61.82 टक्के इतके आहे.
मुंबईत 1,059 नवे रुग्ण आढळून आलेत. तर 45 जणांचा मृत्यू झाला. शहरात 20,749 सक्रिय रुग्ण आहेत. तर मृत्यूचा आकडा 6,395 एवढा झाला आहे.
राज्यात आजवर 21,94,943 नमुने तपासण्यात आले. त्यापैकी 4,31,719 नमुने सकारात्मक आले. सध्या राज्यात 9,08,099 एवढे लोक होम क्वारंटाइन आहेत तर 38,947 लोक संस्थात्मक क्वारंटाइन आहेत.