कोरोना स्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री पुणे शहराच्या दौऱ्यावर….!
सध्या कोरोनाचा कहर मुंबई पाठोपाठ पुणे शहरात सुद्धा वाढताना दिसून येत आहे. याच पार्श्वभूमीवर लवकरच राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पुणे शहरातील कोरोना स्थितीचा आढावा घेण्यसाठी लवकरच भेट देऊ शकतात अशी चर्चा साध्य होताना दिसत आहे.


पुण्यातील कोरोनाचा प्रसार रोखण्याचा मुद्दा राज्य शासनाने गांभीर्याने घेतला असून जिल्ह्यातील सर्व यंत्रणां युद्धपातळीवर कामाला लागल्या आहेत. खुद्द मुख्यमंत्री दोन दिवसात पुण्याला भेट देणार आहेत अशी चर्चा होताना दिसत आहे. त्यांच्या भेटीमुळे या लढाईला अधिकच बळ मिळेल.
पुणे जिल्ह्यात तीन जम्बो कोविड रुग्णालये उभारण्यात येत आहेत. ससुन रुग्णालयासह सर्वच रुग्णालयातील बेडची संख्या वाढवण्यात येत आहे. व्हेन्टीलेटर्स, आयसीयु आणि ऑक्सिजन बेडची संख्या वाढवण्यावर भर असल्याचे यावेळी सांगण्यात आले. गरजू रुग्णांना हे बेड उपलब्ध होण्यासाठी स्वतंत्र व्यवस्थापन यंत्रणा निर्माण करण्यात आली आहे.