खोटे लग्न करून सेवानिवृत्त सैनिकाची फसवणूक ; चौघांच्या टोळीवर बार्शीत गुन्हा
बार्श : खोटे लग्न करून फसवुन त्यांचे कडुन १० लाख रुपये व ३० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने घेऊन माजी सैनिकाची फसवणूक केल्याप्रकरणी चौघांच्या टोळी विरुद्ध बार्शी शहर पोलीसात गुन्हा दाखल झाला आहे.

मोहन बापू शिंदे (रा.श्रीपतपिंपरी ता. बार्शी) असे फसवणूक झालेल्या सेवानिवृत्त माजी सैनिकांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी शकुंतला रामेश्वर गायकवाड उर्फ गांधारी काकु , शितल मारुती बरडे , शिवाजी माणिक जाधव, (तिघे रा. सांजा रोड उस्मानाबाद ) दिलीप मारुती घाडगे रा श्रीपत पिंपरी ता बार्शी असे चौघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
फिर्यादीत म्हटले की माजी सैनिक मोहन शिंदे यांच्या पत्नी शिवगंगा यांचे निधन झाले आहे. शिंदे यांच्या शेजारी राहणार्या दिलीप घाडगे यांनी दुसरे लग्न करण्यास सांगुन दोन मुलीही दाखवल्या परंतु लग्न न जमल्याने घाडगे यांनी शकुंतला उर्फ गांधारी काकुची ओळख करुन दिली . त्यानंतर गांधारी काकुनी बहीणीची मुलगी असल्याची सांगुन बार्शी येथे वधू म्हणून एक मुलगी दाखवली व तिचे नाव शितल मारुती बरडे वय २७ असे सांगितले. शिंदे यांनी दोघांचे वयात अंतर असल्याने लग्न जुळेल का असे विचारले असता शितल हिचे आई वडील गरीब असुन आई आजारी असल्याने त्यांचे पाहणारे कोण नसल्याचे गांधारी काकूनी सांगितले.
त्यानंतर २५ सप्टेंबर २०२० रोजी पानगाव येथे ज्योतीबा मंदीरात वर मोहन व वधू शितल यांचे विवाह झाला. यावेळी शिंदे यांना दिलीप घाडगे याने लग्नापूर्वी शितल हिची आई मयत झाल्याचे सांगुन तुमच्या सोबत कोणी आणूू नका असे सांगितले यावेळी स्वतः माजी सैनिक व दिलीप यांनी कपडे व ३६ ग्रॅम वजनाचे विविध दागिणे घेतले.
लग्ना नंतर गंधारी काकुनी मेजर तुम्ही पांडे चौकात पुढे जा आम्ही तेथे आलो असे सांगून मेजरला पांडे चौकात पाठवले. काही वेळाने रिक्षामध्ये दिलीप घाडगे हा एकटाच आला व सांगितले की, गंधार बाईने व शितल यांना ५ ते ६ मुले सोमाणी वजन काटा सोलापूर रोड येथुन घेवुन गेलेले आहेत. तेव्हा फिर्यादीना त्यांना आपण पोलीस स्टेशनला जावू व तक्रार करू असे सांगितले. त्यावेळी दिलीप घाडगे याने त्यांचे ५ ते ६ वर्षा पासुनचे संबध आहेत.मी शितल हिस ५ ते ६ दिवसात तुमच्याकडे नांदणेसाठी पाठवितो असे सांगितले. त्यानंतर शितल व गंधारी काकु हे मोबाईलद्वारे संपर्कात होत्या.

त्यांना शितल हिस नांदविण्यास पाठविण्यास सांगितले तेव्हा शितल हिस दिनांक ११.१०.२०२० रोजी नांदयाला पाठवित आहे असे सांगितले. पंरतु शितल नांदणेसाठी आली नाही साधरणता दुपारीच्या वेळेस गिता तोडकर यांचा फोन आला की, शितलचे वडील मारूती दिपक बरडे यांनी फाशी घेतली आहे. शितल हिचा फोन लागत नाही ती बार्शीला निघाली आहे तिला बार्शी येथे पोहचात परत पाठवा असे सांगितले.
त्यानंतर दिनांक १३.१०.२०२०२ रोजी गिता रामेश्वर तोडकर या महिलेने फिर्यादीस परत फोन केला व शितलचे वडील बरडे यांचे आत्महत्याचे प्रकरण मिटविणेसाठी ४ लाख रू दया असे सांगितले. त्यामुळे दिनांक १३ ऑक्टोबर ते १८ ऑक्टोबर दरम्यान गंधारी काकु हिचा माणुस शिवाजी माणिक जाधव यास ४ लाख रू तुळजापुर नाका बार्शी येथे दिले.
शिवाजी जाधव हा मोबाईलद्वारे संपर्कात होता.त्यानंतर देखील शितल नांदण्यास आली नाही. दिनांक २८.१२.२०२० रोजी शितल हिने फोन करून आईची व आज्जीची जागा गहाण आहे ती सोडविण्यासाठी दररोज सावकार दारात येत आहे. ती जागा सोडविण्यासाठी ४ लाखाची मागणी केल्याने सदरची जागा सोडविण्यासाठी सदरची रक्कम शिवाजी माणिक जाधव यास चित्रा टकीज बार्शी येथे आणुन दिली.
त्यानंतर शिवाजी माणिक जाधव याने शितल व गिता रामेश्वर तोडकर यांचेत भांडण झाले असुन ते भांडण मिटविणेसाठी महिला मंडळातील महिला जयश्री सुरवसे, रोहिणी कांबळे, माधुरी सावंत यांना देणेसाठी शिवाजी जाधव याने माझेकडून ८७ हजार रू घेतले.त्यानंतर दिनांक २२.६.२०२१ रोजी शकुंतला गरड या महिलेने फोन करून शितलचे लग्नातील सोने गहान ठेवलेले असुन ते सोडवण्यसाठी ९८ हजाराची मागणी केल्यावर ते सोने सोडविण्यासाठी शिवाजी जाधव यास दिले.त्यानंतर देखील शितल हे नांदणेस येण्यासाठी बोलविले असता टाळाटाळ करू लागली.
त्यानंतर फिर्यादीने माहिती काढली असता गंधारी काकु, शितल बरडे व शिवाजी जाधव यांची टोळी असुन ते लग्न करतो म्हणुन अनेक लोकांकडून पैसे घेत असल्याचे फिर्यादीस समजले.व ते अशाच प्रकारे खोटे लग्न करून लोकांकडून फसवुन पैसे व सोन्याचे दागिणे घेत असल्याचे समजुन आले त्यामुळे सदर लोकांनीच शितल हिचेशी खोटे लग्न करून रोख रक्कम व ३३ ग्रॅम सोन्याचे दागिणे घेवुन फसवणुक केली आहे असे फिर्यादीत म्हटले आहे.