बार्शी:विनापरवाना शासनाची टॉयल्टी न भरता ट्रॅक्टर मधून वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर वर तालुका पोलिसांनी गुन्हा दाखल करून तीन लाख 87 हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई मालवंडी येथे करण्यात आली.

दिनांक 11. 4.2021 रोजी वैभव धनाजी भांगे पोलीस कॉन्स्टेबल यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार विकास नवनाथ काळे, अब्बास महमूद शेख राहणार उंदरगाव तालुका माढा जिल्हा सोलापूर यांनी एका नंबर नसलेल्या 380000 किंमत असलेल्या अर्जुन ट्रॅक्टर ट्रॉली मध्ये 1 ब्रास म्हणजेच सात हजार रुपये किमतीची वाळू दिनांक 10.4.2021 मालवंडी तालुका बार्शी जिल्हा सोलापूर एसटी स्टँड च्या समोरून घेऊन जात होता.

शासनाचा कसल्याही प्रकारचा पास परवाना न घेता, अगर रॉयल्टी न भरता पर्यावरणाचा ऱ्हास होतो हे माहीत असून सुद्धा चोरून वाळू उपसा करून वाहतूक केल्यामुळे त्यांच्यावर बार्शी तालुका पोलीस स्टेशन मध्ये पर्यावरण संरक्षण अधिनियम 9व 15 भा. द. वी. क्र.379,34 गुन्हा दाखल झाला आहे. तीन लाख 87 हजार रुपयांचा मुद्देमाल बार्शी तालुका पोलीस स्टेशनने जप्त करून घेतला आहे. पुढील तपास बार्शी तालुका पोलीस करत आहे.