बार्शी तालुक्यातील पाथरीत भरदिवसा घरफोडी,२३ तोळ्यावर चोरट्यांचा डल्ला
बार्शी ; सेवानिवृत्त शिक्षकाच्या बंद घराचा कडी कोयंडा तोडुन घरात प्रवेश करून कपाटातील सोन्याचे दागिणे व रोख रक्कम असा तब्बल ८ लाख २० हजार रूपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केल्याचा प्रकार बार्शी तालुक्यातील पाथरी येथे भरदिवसा घडला.चोरट्यांचा माग काढण्यासाठी श्वानपथक पाचारण करण्यात आले होते.तसेच ठशे तज्ज्ञांकडून पहाणी करण्यात आली.

#सर्जेराव वैजिनाथ पाटील वय ७२ यांनी तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.फिर्यादीत म्हटले आहे की ते पत्नी सह रहाणेस आहेत. सकाळी ९.१५ वाचे सुमारास लाईट बिल भरण्यासाठी ते बार्शीयेथे गेले होते. पत्नी सिंधु ही ओळखीचे प्रकाश नामदेव गायकवाड रा. एस टी स्टॅन्डचे बाजुला पाथरी ता. बार्शी यांचे घरी कार्यक्रम असल्याने स्वयंपाक करण्यासाठी त्यांचे घरी गेली होती.
बार्शीतील सर्व कामे आटोपुन व किरकोळ किराणा घेवुन ते दुपारी १.३० वा बार्शी हुन पाथरी येथे घरी
आलो तेव्हा घराचे समोरील दोन्ही दरवाजे उघडे दिसले.

आत जावुन पाहिले असतादोन्ही खोलीचे कुलुप तुटुन खोलीचे आतमध्ये पडलेले होते. टीव्हीच्या खोलीतील कपाट उघडे दिसले.कपाट पाहिले असता कपाटातील कपडे उचकलेले दिसले. त्यामुळे त्यांनी देवघर असलेले खोलीतील कपाट पाहिले असता सदर कपाटात सोने ठेवलेले पाकीट खाली पडलेले दिसले.
सदर पाकीट उघडुन पाहिले असता त्यामध्ये पत्नीचे व सुनेचे सोन्याचे गंठन व पाटल्या तसेच ठुसी, बोरमाळ व
किरकोळ लहान मुलाच्या सोन्याचे अंगठया व कानातले दिसले नाही. पाकीटे व प्लास्टीक डबी मोकळया होत्या. त्यामुळे मी पत्नीस फोन करून घडलेली घटना सांगुन तीला घरी बोलाविले. पत्नी सिंधु घरी आल्यानंतर आम्ही दोघांनी पुन्हा कपाट तपासले परंतु कपाटात सोने दिसले नाही. त्यामुळे आमची घरात चोरी झाल्याची खात्री झाली.
सकाळी ११.३० वाचे सुमारास घराचे दोन्ही खोलीस कुलुप लावले होते. किचन व देवघर असलेल्या
खोलीस कुलुप लावुन त्याची चावी समोरील टीव्हीचे हॉलमध्ये ठेवली व टीव्हीचे हॉलला कुलुप लावुन
त्याची चावी बाहेरील पिठाचे चक्कीमध्ये ठेवुन प्रकाश नामदेव गायकवाड यांचे घरी गेले असल्याचे
सांगितले. पत्नी चावी पिठाचे चक्कीमध्ये नेहमी ठेवते हे मला माहित आहे.
चोरट्यांनी १० तोळयाच्या ४ सोन्याच्या पाटल्या, ०५ तोळयाचे सोन्याचे गंठण , ०५ तोळयाचे सोन्याचे गंठण ,दिड तोळयाची सोन्याची बोरमाळ , अर्धा तोळयाची सोन्याची ठुसी ,एक तोळा किरकोळ सोने ,व १५ हजार रोख असा बारा हजार रूपयांचा ऐवज लंपास केला.
उपविभागीय पोलीस अधिकारी अभिजित धाराशिवकर, सपोनी शिवाजी जायपत्रे यांनी घटनास्थळी भेट देऊन पहाणी केली. बार्शी तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुध्द चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अधिक तपास शिवाजी जायपत्रे हे करत आहेत.