कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा भंग ; बार्शीतील चांदमल ज्वेलर्स एक महीन्यासाठी सील
सराफ दुकानदार अमृतलाल गुगळे विरुद्ध गुन्हा दाखल
बार्शी प्रतिनिधी


कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा भंग केल्याप्रकरणी तसेच जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या निर्देशांचे उल्लंघन केले म्हणून येथील हळद गल्लीतील चांदमल ज्वेलर्सवर कारवाई करत हे दुकान तीस दिवसांसाठी सील केले. तर सराफ दुकानदार अमृतलाल चांदमल गुगळे यांच्या विरुद्ध बार्शी शहर पोलिसांत गुन्हा दाखल झाला.
बार्शीसह तालुक्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होवू लागल्याने कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांची कडक अंमलबजावणी सुरू झाली आहे. जिल्ह्यात अत्यावश्यक सेवा वगळता सर्व आस्थापना बंद ठेवण्याचे आदेश असताना बार्शी शहरचे पो नि संतोष गिरिगोसावी यांचे मार्गदर्शनाखाली शहर पोलीस पथकातील आदलिंगे , सय्यद , वाघमोडे हे शहरात पेट्रोलिंग करत असताना दुपारी १ वाजण्याच्या सुमारास हळद गल्लीतील सराफ दुकानदार अमृतलाल चांदमल गुगळे ( वय ६३ रा.भवानीपेठ , बार्शी ) यांनी चांदमल ज्वेलर्स हे दुकान उघडे ठेवले होते. दुकान उघडण्या बाबत चौकशी केली असता खात्रीशिर उत्तर न देता उडवाउडवीची उत्तरे दिली.
जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यात कोरोनाचा विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजनाचे जाणीवपुर्वक हयगयीने व मानवी जीवीत व वैयक्तीक सुरक्षा धोक्यात येईल असे कृत्य करून कोव्हीड १९ विषाणूचा संसर्ग पसरविण्याची घातक कृती करून शासनाचे आदेशाचे उल्लंघन केल्या प्रकरणी चांदमल ज्वेलर्स दुकान तीस दिवसांकरीता सील करण्यात आले .अधिक तपास पोलीस रुपेश शेलार हे करीत आहे.