Breaking – दारू पिणाऱ्यासाठी खुशखबर, केंद्र सरकारने घेतला हा निर्णय; वाचा सविस्तर

0
298

नवी दिल्ली | कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी 4 मेपासून तिसरा लॉकडाऊन सुरू होणार आहे. हा तिसरा लॉकडाऊन केंद्र सरकारने सुरू केला असला तरी यामध्ये ग्रीन झोनमधील समाविष्ट असलेल्या जिल्ह्यामध्ये दारुची दुकानं, आणि पान शॉप उघडले जाणार असल्याची माहिती मिळत आहे. मात्र त्यातही मोठ्या अटी आणि शर्ती असणार आहे.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

खरेदीदारांना या दुकानांच्या पाच ते सहा फुट अंतर ठेवावे लागणार आहे. तसेच एकावेळी पाचपेक्षा अधिक लोक दुकानसमोर किंवा दुकानात उभे राहू शकणार नाहीये. आवश्यक आणि अनावश्यक कोणताही भेदभाव न करता, सर्व स्टँडअलोन दुकाने, आसपासची दुकाने आणि निवासी कॉम्प्लेक्स शॉप यांना शहरी संकुलामध्ये परवानगी दिली जाईल. खाजगी कार्यालये आवश्यकतेनुसार 33 टक्के क्षमतेसह सुरु होऊ शकतात, उर्वरित कर्मचारी घरातूनच काम करत राहतील.

ऑरेंज झोनमध्ये रेड झोनमध्ये परवानगी असलेल्या क्रियाकलाप व्यतिरिक्त टॅक्सी आणि कॅब अ‍ॅग्रिगटरना केवळ एक ड्रायव्हर आणि एक प्रवासी यांच्यासह परवानगी असेल. केवळ सरकारने ठरविलेल्या कामांसाठी लोकांना आणि वाहनांना एका जिल्ह्यातून दुसर्‍या जिल्ह्यात जाण्याची परवानगी देण्यात येईल. चारचाकी वाहनासह जास्तीत जास्त दोन प्रवासी असतील, त्याशिवाय आता दुचाकीवरून दोन लोकांना प्रवास करण्यास परवानगी देण्यात येणार आहे.

कोरोना विषाणूचे लॉकडाऊन 3 मेनंतर देशभरात आणखी दोन आठवडे वाढविण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. लॉकडाऊनचा दुसरा टप्पा 3 मेपर्यंत सुरू राहणार होता, त्यासंदर्भात सरकारने आणखी दोन आठवडे वाढविले आहेत. आता हे लॉकडाऊन 17 मे पर्यंत सुरू राहणार आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने म्हटले आहे की कोविड19 वरील परिस्थितीचा विस्तृत आढावा घेतल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, 2005 अन्वये मंत्रालयाने 3 मेपासून दोन आठवड्यांच्या कालावधीसाठी लॉकडाऊन वाढविण्याचे आदेश जारी केल्याचे अधिकृत निवेदनात म्हटले आहे.

लॉकडाऊनचा पहिला टप्पा 25 मार्च ते 14 एप्रिल दरम्यान होता, जो नंतर (15 एप्रिलपासून) 3 मे पर्यंत (दुसरा टप्पा) वाढविला गेला. नवीन लॉकडाउन मार्गदर्शक तत्त्वांनुसार, काही क्रियाकलापांवर अद्याप बंदी घातली जाईल. लॉकडाऊनच्या विस्तारित कालावधीत, हवाई, रेल्वे, मेट्रो प्रवास आणि रस्ते आणि शाळा, महाविद्यालये आंतरराज्यीय रहदारी बंद राहतील.लॉकडाऊनचा दुसरा टप्पा संपण्यापूर्वी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोनमधील सर्व जिल्ह्यांचे विभाजन केले आहे. देशातील 130 जिल्हे रेड झोनमध्ये, 244 ऑरेंज झोन आणि 319 ग्रीन झोन म्हणून घोषित करण्यात आली आहेत.

Best IT Comany In Maharashtra , Solapur