BoycottKhans टॉप ट्रेंडमध्ये खान विरोधात लोकांचा रोष….!
अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणात बॉलीवूडमध्ये शीतयुद्ध सुरु झालं आहे. अनेक कलाकारांनी सुशांत सिंह राजपूत प्रकरणात बॉलिवूडमधील घराणेशाहीला जबाबदार धरलं आहे. अभिनेत्री कंगना रनौत, दिग्दर्शक अभिनव कश्यप, अभिनेते प्रकाश राज यांनी बॉलिवूडमधील घराणेशाहीची काळी बाजू जगासमोर आणली आहे. या प्रकरणावरून नेटकऱ्यांनी देखील करण जोहर, एकता कपूर, सलमान खान, संजय लीला भन्साळी यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका केली आहे. या सर्वांवर टीका होत असतानाच बिहारमधील एक वकिल सुधीर कुमार ओझा यांनी या सर्वांविरोधाततक्रार दाखल केली आहे.


या प्रकरणात करण जोहरला मोठ्या प्रमाणावर लक्ष्य केले जात आहे.करणने सुशांतला श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी एक इन्स्टाग्राम पोस्ट लिहिली होती. गेल्या वर्षभरापासून मी तुझ्या संपर्कात नव्हतो. या गोष्टीचा मला खेद आहे, अशा आशायाची पोस्ट लिहून करणने सुशांतला श्रद्धांजली दिली होती.मात्र या पोस्टमुळे संतापाची लाट उसळली. अशातच आता ट्विटरवर #BoycottKhans टॉप ट्रेंडमध्ये दिसत आहे.

अनेकांनी तर सलमान, शाहरूख आणि आमिर या तिघांनीही बॉलिवूडमधून बॉयकॉट करण्याची मागणी केली आहे. मात्र काहींनी अद्याप सलमान-शाहरुख यांना पाठिंबा दिला आहे आणि यावरूनच सुशांतचे चाहते आणि सलमान-शाहरुख यांचे चाहते यांच्यात ट्विटर वॉर सुरू आहे. त्यामुळेच आता ट्विटरवर #BoycottKhans टॉप ट्रेंडमध्ये दिसत आहे.