फोटो पाठवला आहे.
फोटो ओळी ः बार्शीचे ज्येष्ठ धन्वंतरी डॉ.बी.वाय.यादव यांच्या वाढदिवासानिमित्त इंडीयन मेडीकल असोसिएशनच्या वतीने आयोजित रक्तदान शिबीराप्रसंगी आयएमए बार्शी व रेडक्रॉस सोसायटीचे पदाधिकारी
बार्शीत डॉ बी वाय यादव यांच्या सन्मानार्थ रक्तदान शिबीर
बार्शी ः इंडीयन रेडक्रॉस सोसायटी उपाध्यक्ष डॉ.बी.वाय.यादव यांच्या वाढदिवसानिमित्त रविवारी (ता.26) इंडीयन मेडीकल असोसिएशन बार्शीच्या वतीने श्रीमान रामभाई शाह रक्तपेढीत घेण्यात आलेल्या रक्तदान शिबीरात रक्तदात्यांनी विशेषत वैद्यकिय क्षेत्रातील रक्तदात्यांनी उस्फूर्तपणे रक्तदान करत डॉ.यादव यांना वाढदिवासाच्या अनोख्या शुभेच्छा दिल्या.

शिबीराची सुरवात डॉ.मीरा यादव यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून झाले. यावेळी इंडीयन मेडीकल असोसिएशन बार्शीचे अध्यक्ष डॉ.प्रशांत मोहिरे, उपाध्यक्ष डॉ.विवेकानंद जानराव, सत्कारमूर्ती डॉ.बी.वाय.यादव, रामभाई शाह रक्तपेढीचे चेअरमन डॉ.विक्रम निमकर, उपाध्यक्ष अजित कुंकूलोळ, डॉ.रामचंद्र जगताप, डॉ.भरत गायकवाड, डॉ.कृष्णा मस्तूद, डॉ. योगेश सोमाणी, कविता अंधारे उपस्थित होते.

राज्यात रक्ताचा तुटवडा जाणवत असल्याच्या पार्श्वभूमीवर इंडीयन मेडीकल असोसिएशन बार्शीच्या वतीने बार्शीचे ज्येष्ठ धन्वंतरी डॉ.बी.वाय.यादव यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आल्याचे डॉ.मोहिरे यांनी सांगितले. कोरोना महामारीनंतर रक्ताची मागणी वाढली असून त्याप्रमाणात रक्तपुरवठा करण्यात अडचणी येत असल्याने जास्तीत जास्त शिबीरांच्या माध्यमातून रक्तसंकलन करण्याचा मानस यावेळी रक्तपेढीचे अध्यक्ष डॉ.निमकर यांनी व्यक्त केला. शिबीर यशस्वीतेसाठी प्रशांत बुडूख, विजय दिवाणजी, सुधीर सुमंत यांनी परिश्रम घेतले.
दरम्यान करमाळा तालुक्यातील वरकुटे या डॉ.यादव यांच्या जन्मगावी देखील रविवारी रक्तपेढीने शिबीराचे आयोजन केले होते. शिबीराचे उदघाटन जिल्हा परिषदचे अध्यक्ष अनिरूध्द कांबळे, वरकुटे ग्रामपंचायतीचे सरपंच दादासाहेब भांडवलकर, उपसरपंच आण्णासाहेब बेडकुटे, माजी सरपंच महादेव शिंदे अजित तळेकर, शेखर गाडे, दीपक शिंदे, बहिर आदी उपस्थित होते. डॉ.लक्ष्मीकांत काबरा, डॉ.श्रीपाद नांदुरकर, डॉ.विलास देशमुख, डॉ.राघवेंद्र अणवेकर, डॉ.दिलीप कराड, डॉ.संजय अंधारे, डॉ.कैवल्य गायकवाड, डॉ.पुष्कराज यादव, डॉ.प्रशांत मोहिरे, धनुभाई शाह, दिनेश मिटकरी यांनी रक्तदान केले.
चौकट ः शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ.बी.वाय.यादव यांच्या वाढदिवासानिमित्त संस्थेच्या वतीने संत तुकाराम सभागृहात सोमवारी (ता.27) सकाळी 9 ते दुपारी 2 या वेळेत श्रीमान रामभाई शाह रक्तपेढीच्या सहकार्याने रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले असून रक्तदान करावे असे आवाहन संयोजकांनी केले आहे.