भाजपकडून अफवा पसरवण्याचे उद्योग सुरू : सचिन सावंत
: सारथी संस्था बंद होणार, या अफवा पसरवून भाजप हिन राजकारण करत आहे; परंतु सारथी संस्था बंद होणार तर नाहीच, पण ती अधिक मजबूत केली जाईल. ज्या भाजप नेत्यांनी सारथी संस्थेच्या उद्घाटनाला झालेल्या खर्चाची देयके थकवली. त्या पक्षाच्या नेत्यांनी संस्था कशी चालवायची, याचे ज्ञान आम्हाला देऊ नये, असा खणखणीत इशारा, महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी दिला आहे.

सारथी बंद पडण्याच्या अफवा भाजप पसरवत आहे. मात्र, मराठा समाजाच्या 50 पेक्षा अधिक जणांच्या मृत्यूला त्यांचेच सरकार कारणीभूत आहे. फडणवीस यांच्या काळात या संस्थेची काय अवस्था होती, हे मराठा समाजाला आठवत असल्याने ते अशा राजकारणाला बळी पडणार नाहीत.

जानेवारी 2017 पासून वीसपेक्षा अधिक महिने साधा एक कर्मचारीही या संस्थेला दिला नव्हता. फडणवीस यांनी उद्घाटन करूनही अनेक महिने कामकाज सुरू झाले नव्हते. चंद्रकांत पाटील यांनी जाहीर करूनही अनेक महिने निधीची तरतूदही केली नव्हती.
मुख्यमंत्री म्हणून सारथीच्या कार्यालयाचे फडणवीस यांनी उद्घाटन केले, पण त्यानंतर उद्घाटनाला झालेल्या खर्चाची बिले न दिल्याने थकबाकीदार कार्यालयात ठाण मांडून बसले होते, असेही सावंत यावेळी म्हणाले. भाजप नेत्यांनी खोटी, दिशाभूल करणारी माहिती पसरवून मराठा समाजात विष कालवण्याचे उद्योग बंद करावेत, असेही सावंत म्हणाले.
साभार ऍग्रोवन ई ग्राम