ग्लोबल न्युज : भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सरचिटणीस विधानपरिषद सदस्य सुजितसिंह ठाकूर यांच्यासह कुटुंबातील सहाजण कोरोनाबाधीत झाले आहेत. काही दिवसापूर्वी आमदार ठाकूर यांच्या आई आजारी असल्याने मंगळवारी (ता.४) कुटुंबातील सर्वांची रॅपीड अॅन्टीजन टेस्ट करण्यात आली होती. याबाबत त्यांनी सोशल मीडियावर ही माहिती स्वतः दिली.


ठाकूर यांच्या कुटूंबातील सहा सदस्य कोरोना बाधित असल्याचा अहवाल आला आहे. रविवारी (ता.९) पून्हा सदस्य व संपर्कातील सर्वांचे आरटीपीसीआर करण्यात आले. दरम्यान कुटूंबातील आणखी तीन तर संपर्कातील तीन जण बाधित असल्याचा अहवाल आला आहे.
अजूनही तीन जणांचे अहवाल येण्याचे बाकी असून आमदार ठाकूर यांच्यासह सर्वांची प्रकृती चांगली असल्याची माहिती ठाकूर यांनी सोशल मिडीयाद्वारे प्रसारित केली आहे. आपल्या संपर्कात आलेल्यांनीही कोरोना तपासणी करुन घ्यावी असेही ठाकूर यांनी आवाहन केले आहे. दरम्यान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ही लवकर बरे व्हा म्हणून आ ठाकूर याना शुभेच्छा दिल्या आहेत.
मी ३ ऑगस्टपासून बाहेर कोणाच्याही संपर्कात नाही. काळजीपोटी अनेकांचे फोन येतात, मात्र सर्वांना उत्तर देणं शक्य नाही. मोबाईल संदेशाद्वारे कामासाठी उपलब्ध असेन.
–सुजितसिंह ठाकूर, प्रदेश सरचिटणीस, भाजपा.