सोलापूरात बर्या झालेल्या रूग्णांबरोबरच
पॉझिटिव्ह रूग्णांची संख्याही वाढतेय
सोलापूर-सोलापूरात आज सायंकाळी 8 वाजता मिळालेल्या माहितीनुसार कोरोना बाधितांची संख्या 565 इतकी झाली आहे. तर आत्तापर्यंत बरे झालेल्या रूग्णांची संख्या 249 असून 270 जणांवर उपचार सुरू आहेत. मृतांची संख्या आत्तापर्यंत 46 इतकी झाली आहे.

आत्तापर्यंत 5475 व्यक्तींची कोरोना चाचणी झाली असून यातील 5423 जणांचे अहवाल प्राप्त झाले आहेत. यात 4858 निगेटिव्ह तर 565 पॉझिटिव्ह अहवाल आले आहेत. 52 अहवाल प्रलंबित आहेत.
आज एका दिवसात 229 अहवाल आले यात 180 निगेटिव्ह तर 49 पॉझिटिव्ह आहेत. यामध्ये 27 पुरूष आणि 22 महिलांचा समावेश आहे. आज जवळपास 25 रूग्णांचा बरं झाल्यानं घरी सोडण्यात आलं तर 6 जणांचा मृत्यू झाल्याची नोंद आज आहे. यात 3 पुरूष, 3 महिलांचा समावेश आहे.
आज मृत पावलेल्या अक्कलकोट मधला मारूती येथील 46 वर्षीय पुरूष, उत्तर कसबा पत्रा तालीम येथील 71 वर्षीय पुरूष, शिवशरण नगर एमआयडीसी येथील 52 वर्षीय पुरूष, मिलिंद नगर बुधवार पेठ येथील 69 वर्षीय महिला, मोदी परिसरातील 67 वर्षीय महिला, तसेच न्यू पाच्छा पेठ येथील 78 वर्षीय महिलेचा समावेश आहे. या सर्वांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती.


आज ज्या भागातील व्यक्ती पॉझिटिव्ह मिळून आल्या ते पुढीलप्रमाणे – गंगा चौक निलमनगर 1 महिला.
राऊत वस्ती मजरेवाडी 1 पुरूष.
कुर्बान हुसेन नगर 1 पुरूष.
कर्णिक नगर 1 पुरूष. कुमठा नाका 2 पुरूष. बुधवार पेठ 1 पुरूष. सिध्देश्वर नगर 1 पुरूष. फॉरेस्ट रेल्वे लाईन 1 महिला.
विडी घरकुल 2 पुरूष. जुना विडी घरकुल 2 महिला.
इंदिरा नगर 70 फूट रोड 2 पुरूष, 1 महिला.
भारतरत्न इंदिरा नगर 1 पुरूष.
मोदी पोलीस स्टेशन 2 पुरूष.
पाच्छा पेठ 2 पुरूष, 1 महिला.
बादशा पेठ 2 महिला. न्यू बुधवार पेठ 3 महिला.
मैत्री नगर एमआयडीसी 1 पुरूष, 1 महिला. निखिलपार्क आरटीओ ऑफिसजवळ 1 पुरूष. शाहिर वस्ती भवानी पेठ 1 पुरूष. मोदी 1 महिला.
सुशीलनगर विजापूर रोड 1 पुरूष. अंबिकानगर एमआयडीसी 1 महिला. साईबाबा चौक 3 महिला.
बाळीवेस 1 पुरूष, 4 महिला.
सातरस्ता 1 पुरूष.
पोलीस मुख्यालय अशोक चौक 1 पुरूष. शामानगर मोदी 2 पुरूष, 1 महिला.
मधला मारूती अक्कलकोट 1 पुरूष. सिव्हील हॉस्पिटल क्वार्टर (मुळगांव मौजे जांभुड ता. माळशिरस) 1 पुरूष. यांचा समावेश आहे.