Big Breaking- महाराष्ट्रात लॉकडाऊन 31 मेपर्यंत वाढवला

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात लॉकडाऊन करण्यात आलं आहे. लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्याची मुदत 17 मे रोजी संपत आहे.
पण, कोरोनाला रोखण्यासाठी लॉकडाऊनचा चौथा टप्पा घोषित करण्यात आला आहे. हा टप्पा 31 मे 2020च्या मध्यरात्रीपर्यंत राहणार आहे.

राज्यसरकार तर्फे एक परिपत्रक जाहीर करण्यात आलं असून त्यात कोरोना विषाणूला रोखण्यासाठी लॉकडाऊन वाढवत असल्याचं नमूद करण्यात आलं आहे.

तूर्तास लॉकडाऊनमधील सद्यपरिस्थितीतील नियम, बंधने, बंधनांतील शिथीलता तशीच पुढे सुरू राहणार असून त्यात झालेले बदल वेळोवेळी सूचित केले जातील, असंही नमूद करण्यात आलं आहे.

नवीन लॉकडाऊनबाबत मार्गदर्शक सूचना थोड्याच वेळात जाहीर करण्यात येणार असल्याचे राज्य शासनाने म्हटले आहे. नव्या लॉकडाूनचे नियम काय असणार आहेत, याबाबत राज्यातील नागरिकांमध्ये तीव्र उत्सुकता आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करून आर्थिक चक्र सुरू करण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करीत असल्याचे दिसत आहे.
महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक रुग्ण आहेत. दरम्यान मागील काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊनचा चौथा टप्पा लागू होणार असल्याचे सांगितले होते. मात्र, त्याचे स्वरूप राज्य सरकार स्पष्ट करतील असेही सांगितले होते. त्या पार्श्वभूमीवर चौथा टप्पा लागू करण्यात आला आहे.
ग्रीन झोन, ऑरेंज झोन आणि रेड झोन नुसार विविध क्षेत्रांत सूट दिली जाणार आहे. कोणत्या झोनमध्ये किती आणि कोणत्या गोष्टींना सूट दिली जाणार त्याची नियमावली शासनाकडून स्पष्ट केली जाणार आहे.