नगरसेवक बापू वाणी यांची सोपल गटाला सोडचिठ्ठी, आमदार राऊत गटात केला प्रवेश
प्रशांत खराडे
आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

बार्शी नगरपलिकेतील माजी मंत्री दिलीप सोपल गटाचे (शिवसेनेचे) विद्यमान नगरसेवक बापुसाहेब वाणी त्यांच्या शेकडो समर्थकांसह भारतीय जनता पार्टी (आमदार राजेंद्र राऊत गटामध्ये)मध्ये प्रवेश केला.आमदार राजाभाऊ राऊत यांनी त्यांचे स्वागत केले.

यावेळी नगराध्यक्ष आसिफभाई तांबोळी, माजी नगराध्यक्ष विश्वासभाऊ बारबोले, बाजार समितीचे संचालक रावसाहेब मनगिरे , माजी नगराध्यक्ष रमेश पाटील,माजी उपनगराध्यक्ष नवनाथ चांदणे नगरसेवक सुभाषशेठ लोढा, भारत पवार ,श्रीधर कांबळे ,बाजार समितीचे चेरमन रणवीर राऊत, नगरसेवककाकासाहेब फुरडे, धनाजी मोरे, शिरीष आण्णा जाधव आदी उपस्थित होते.

बापू आणि हे दिलीप सोपल यांचे कट्टर समर्थक होते. त्यांचे वाणी प्लॉट, कॅन्सर हॉस्पिटल आदी परिसरात मोठे वजन आहे. या प्रवेशामुळे राऊत गटाला या भागात फायदा होणार आहे.
