Big Breaking ! देशातील लॉकडाऊन 17 मेपर्यंत वाढविण्याचा निर्णय ;वाचा सविस्तर-

0
414

ग्लोबल न्युज: न्यूज – देशातील सर्वात मोठी बातमी हाती आली आहे. कोरोना विषाणू विरुद्ध युद्ध जिंकण्यासाठी देशात सुरू असलेला 40 दिवसांचा लॉकडाऊन आणखी दोन आठवड्यांसाठी वाढविण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला आहे. त्यासंदर्भातील आदेश केंद्रीय गृहमंत्रालयाने आज संध्याकाळी जारी केले. त्यामुळे चार मेला संपणारा लॉकडाऊनची मुदत आता 17 मेपर्यंत वाढविण्यात आली आहे.

देशात 23 मार्चला मध्यरात्रीपासून देशव्यापी लॉकडाऊन सुरू झाला. प्रथम 21 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता. त्यानंतर 14 एप्रिलला त्यात 19 दिवसांची वाढ करण्यात आली. त्यामुळे लॉकडाऊनची एकूण मुदत 40 दिवसांची झाली. या दोन्ही महत्त्वपूर्ण घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात केली होती.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

यावेळी प्रथमच एका प्रेसनोटद्वारे केंद्रीय गृह मंत्रालयाने लॉकडाऊनला आणखी दोन आठवड्याची मुदतवाढ दिल्याची घोषणा केली. त्यामुळे आता 17 मेपर्यंत लॉकडाऊन असणार आहे. अचानक झालेली ही घोषणा देशवासीयांसाठी आज धक्कादायक ठरली. त्यामुळे आता देशातील लॉकडाऊन 54 दिवसांचा असणार आहे.

केंद्र शासनाच्या गृह खात्याने आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 नुसार देशात लॉकडाऊनची मुदत चार मेच्या पुढे दोन आठवड्यांसाठी म्हणजेच 17 मेपर्यंत वाढविण्याबाबतचा आदेश जारी केला. कोरोनाचा संसर्ग चिंताजनक असलेल्या रेड झोनमध्ये लॉकडाऊनमधून कोणत्याही प्रकारची सवलत दिली जाणार नाही. रेड झोनमध्ये या लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

रेड झोनमधून कोणालाही बाहेर जाण्यास तसेच बाहेरच्या व्यक्तीला रेड झोनमध्ये प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे. या लॉकडाऊनमध्येही सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पूर्णपणे बंद राहणार आहे. शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक संस्था याप्रमाणेच अत्यावश्यक वस्तूंचे दुकाने वगळून सर्व दुकाने, मॉल, चित्रपटगृहे, जिम पूर्णपणे बंद राहणार आहेत. उद्योग व व्यवसाय देखील बंद राहणार आहेत.

Best IT Comany In Maharashtra , Solapur