भगवान पवार यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन
बार्शी – माजी मंत्री दिलीप सोपल यांचे विश्वासू स्वीय सहायक भगवान विठ्ठलराव पवार यांचे आज सकाळी दुःखद निधन झाले. ह्रदविकाराचा झटका आल्याने त्यांचे निधन झाल्याची माहिती पवार कुटुंबियांच्या निकटवर्तीयांनी दिली.
आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा


सदैव हसमुख, मनमिळावू आणि अतिशय संवेदनशील असा त्यांचा स्वभाव होता, त्यांच्या निधनाने सर्वत्र शोककळा पसरली आहे.ते बार्शी बृहत सोसायटीचे सचिव देखील होते.
अनेक वर्षांपासून सोपल यांच्या निवासस्थानी त्यांचे स्वीय सहायक म्हणून त्यानी चोख पणे जबाबदारी पार पाडली आहे. मागील आठवड्यात त्यांच्या मुलाचे लग्न झालं होते.त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून, मुली, जावई असा परिवार आहे.