बीड – विनायक मेटे अपघाताला वेगळं वळण; अपघात की घातपात या संदर्भात मलाही संशय वाटतोय – ज्योती मेटे

0
79

बीड – विनायक मेटे अपघाताला वेगळं वळण; अपघात की घातपात या संदर्भात मलाही संशय वाटतोय – ज्योती मेटे

बीड – विनायक मेटे यांच्या अपघाता संदर्भातील कॉल रेकॉर्डींग समोर आल्यानंतर या संदर्भात विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांना विचारले असता ही क्लिप मी आत्ताच ऐकलेली आहे. अण्णासाहेब मायकर यांच्याशी माझा देखील बोलणं झाल आहे. त्यामुळे या एकूण प्रकाराची चौकशी झाली पाहिजे.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

तीन ऑगस्टला असाच प्रकार घडल्याचे देखील अण्णासाहेब यांनी सांगितले, त्यामुळे या संपूर्ण प्रकाराची सखोल चौकशी झाली पाहिजे मला देखील यामध्ये संशय वाटतो आहे. अपघातातील गाडी आणि तीन तारखेची गाडी याची देखील चौकशी झाली पाहिजे आणि संपूर्ण प्रकाराची चौकशी करून न्याय मिळाला पाहिजे अशी मागणी विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांनी केली आहे.

Best IT Comany In Maharashtra , Solapur

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here