बार्शी : कौशल्या अभिमान साबळे (वय५५), रा.उंबरगे, ता.बार्शी व त्यांचे पती अभिमान माणिक साबळे हे दि. १२ एप्रिल २०२२ रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास मौजे आगळगाव शिवारातील शेतामध्ये दगड गोळा करत असताना, लक्ष्मण महादेव विधाते, पांडुरंग महादेव विधाते, गणेश लक्ष्मण विधाते, ऋषिकेश लक्ष्मण विधाते, व सागर पांडुरंग विधाते (सर्व रा.उंबरगे, ता.बार्शी) यांनी तेथे येऊन, तुम्ही आमच्या बांधावर ताल का टाकली या कारणावरुन मला व माझ्या पतीला शिवीगाळी करुन लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच लक्ष्मण महादेव विधाते याने माझे डोक्यात व डाव्या हाताच्या अंगठ्यावर दगड मारुन मला जखमी केले आणि तुला व तुझ्या नवऱ्याला जिवंत ठेवणार नाही असे म्हणून दमदाटी केली. अशी तक्रार कौशल्या अभिमान साबळे यांनी बार्शी तालुका पोलीस ठाणे येथे दिली. त्यावरुन पांच जणाविरुध्द गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
