आमदार राजेंद्र राऊत व मर्चंट असो. ची प्रत्येकी अडीच लाखांची मदत
पंढरपूरात उभारण्यात येणाऱ्या पोलीसांच्या कोविड रुग्णालयासाठी बार्शीकरांची 5 लाखाची मदत
कोरोना महामारीत सर्वात पुढे आघाडीवर राहून, आपला जीव धोक्यात घालून लढणारे पोलिस बांधव जर दुर्दैवाने या लढाईत कोरोना बाधीत झाले व त्याची बाधा त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींना पोहोचली तर त्यांच्यावर तात्काळ उपचार करण्यासाठी मा.पोलीस अधिक्षक सौ.तेजस्वी सातपुते यांनी सोलापूर जिल्ह्यातील पोलिस बांधवांसाठी पंढरपूर येथे कोविड हॉस्पिटल उभारणी केली आहे.


त्यांच्या या कोवीड हॉस्पिटल उभारणीच्या कार्याला सलाम करण्यासाठी व सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी आमदार राजेंद्र राऊत यांनी 2 लाख 51 हजार रुपयांचा धनादेश व दि व्यापारी मर्चंट असोसिएशनच्या वतीने 2 लाख 50 हजार रुपयांचा धनादेश मदत म्हणून बार्शी शहर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मा. संतोष गिरीगोसावी यांना सुपूर्द करण्यात आला.
यावेळी बार्शी नगरपरिषदेचे पक्षनेते विजय नाना राऊत, दि व्यापारी मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष दामोदर काळदाते, मुन्नाशेठ सोनिग्रा, सचिन मडके उपस्थित होते.