बार्शी! माहेरुन पैसे आण म्हणून पांगरी येथील महिलेस सासरच्या मंडळींकडून मारहाण
बार्शी/प्रतिनिधी:
फिर्यादी नवनाथ भागवत बगाडे (वय 46) सध्या राहणार दहीवडी,तालुका माण,जिल्हा सातारा,मुळ गाव पांगरी,तालुका बार्शी यांनी दिलेल्या बार्शी येथील सुविधा हाँस्पीटल येथे दिलेल्या जबाबानुसार फिर्यादीची मुलगी कोमल अक्षय कांबळे हीस पांगरी,तालुका बार्शी येथे लग्न करून दिलेले आहे.फिर्यादीची मुलगी कोमल हीचे सासरचे लोकांनी ऊस तोडी करीता उचली घेतलेल्या असुन उचलीचे पैसे घेवुन ते लोक काम न करता आल्याने ज्यांच्या कडुन उचल पैसे घेतले आहेत.त्या लोकांनी कोमल हीचे सासरचे लोकांना पैसै परत देणेकरता तगादा लावला आहे.

त्यामुळे मुलगी कोमल हीचा पती अक्षय कांबळे,सासरा बाबपुराव अश्रुबा कांबळे,सासु गीता कांबळे व दिर अजय कांबळे यांनी मुलगी कोमल हीस माहेरून 25 हजार रुपये घेवुन ये म्हणुन नेहमी शिवीगाळी व मारहाण करत होते.दि 31 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास सासरा बापुराव कांबळे याने दारू पिवुन मुलगी कोमल हीस अर्वाच्छ शिव्या देताना फार्यादीचा भाऊ प्रवीण बगाडे याने बापुराव कांबळे यास कोमल हीस शिव्या देवु नको असे समजावुन सांगुन तो निघुन गेला.

त्यानंतर बापुराव कांबळे याने मुलगी कोमल हीस मारहाण केल्याने फिर्यादीचे वडिल भागवत बगाडे यांनी फिर्यादीला फोन करून हकीगत सांगितली व तु येवुन त्यांना समजावुन सांग असा फोन झाल्याने दहीवडी येथुन फिर्यादीची पत्नी सुनिता बगाडे असे रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास कोमल हीचे घराच्या जवळील काळुबाईचे मंदिरा जवळ आले असता कोमल हीस तिची सासु मारहाण करत असताना फिर्यादीची पत्नी सुनिता हीस गीता कांबळे यांनी शिवीगाळी करून मारहाण करत असताना बापुराव कांबळे हा हातात लाकडी काठी घेवुन पळत आला व आरडा ओरडा होत असताना अक्षय हा देखील तेथील ठिकाणी आला.
त्यावेळी तेथे फिर्यादीची आई ,वडिल,भावजय व भाऊ तेथे आले व बापुराव कांबळे यास समजावुन सांगत असताना बापुराव कांबळे याने शिवीगाळी करून हातातील लाकडी काठीने फिर्यादीला मारले व नंतर अक्षय याने देखील फिर्यादीला मारहाण करत असताना बापुराव कांबळे याने फिर्यादीच्या डाव्या पायावर लाकडी काठीने मारले.
तसेच गीता कांबळे हीने फिर्यादीस शिवीगाळी करून फिर्यादीच्या पत्नीस व मुलीला मारहाण केली.तसेच बापुराव कांबळे,अक्षय कांबळे,गीता कांबळे यांनी फिर्यादीचे भाऊ,भआवजय,आई व वडिल यांना देखील शिवीगाळ करून मारहाण केली आहे.त्यानंतर जमलेल्या लोकांनी सोडवा सोडव केल्यानंतर सर्वांना सरकारी दवाखाना पांगरी येथे नेले.त्यानंतर देखील अजय कांबळे याने फिर्यदीच्या भावाच्या घरी जावुन फिर्यादीच्या भावाला शिवीगाळी करून यापुढे आमचे नादाला लागु नका,नाहीतर तुंम्हाला बघुन घेईन व नवनाथ बगाडे यास त्याचा पाय काढीन अशी धमकि देवुन निघून गेला.
सदर मारहाणी मध्ये फिर्यादीच्या डावा पाय फ्रँक्चर झाला आहे.म्हणून फिर्यादीने पांगरी ग्रामीण रूग्नालय येथे उपचार घेवुन पुढील उपचारा करीता सुविधा हाँस्पीटल बार्शी येथे दाखल असुन सध्या फिर्यादीवर उपचार चालु असुन फिर्यादी पुर्णपणे शुद्धीवर आहे.म्हणून या सर्व आरोपींवारुध्द भारतीय दंड संहिता ३२३, ३२६, ३४, ५०४,५०६ नुसार गुम्हा नोंदवण्यात आला आहे.अधिक तपास बार्शी पोलीस करीतआहेत.