प्रांताधिकारी निकम यांच्यावर ठपका ठेवत बार्शीचे तालुका वैद्यकीय अधिकारी संतोष जोगदंड गेले वैद्यकीय रजेवर
तात्पुरता पदभार चिखर्डे च्या अशोक ढगेंवर
बार्शी: कोविड महामारीच्या काळात सरकारच्या सर्व विभागाने समन्वयाने कामकाज करणे अपेक्षित असते. मात्र बार्शी तालुक्यात तसे होताना दिसत नाही. उपविभागीय अधिकारी क्रमांक1 सोलापूर तथा इन्सिडंट कमांडीग ऑफिसर हेमंत निकम यांच्या कामकाजाच्या कार्यपद्धतीला वैतागून व प्रचंड मानसीक तणाव निर्माण होऊन शारीरिक स्वास्थ्य बिघडल्याने बार्शी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ संतोष जोगदंड हे पंधरा दिवसाच्या वैद्यकीय रजेवर गेले आहेत.

त्यांचा रजेचा अर्ज जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी मंजूर केला आहे. त्यांच्या जागी तात्पुरत्या स्वरूपात चिखर्डे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ अशोक ढगे यांच्याकडे पदभार दिला आहे.

याबाबत जोगदंड यांनी मागील आठवड्यात प्रांताधिकारी निकम यांच्या कामकाजाबाबत गोपनीय अहवालाद्वारे जिल्हाधिकारी व जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकारी यांना कळवले होते. त्यानंतर जिल्हाधिकारी यांनी बार्शीत लक्ष घालून बैठका घेतल्या. व ते बार्शीत तळ ठोकून राहिले.

या दरम्यान त्यानी जोगदंड यांच्यावर राग धरून जाणीवपूर्वक सातत्याने लेखी खुलासे वजा ज्ञापने देण्यास सुरुवात केली. जोगदंड यांनी पत्र देण्याअगोदर म्हणजे 18 जुलै पर्यत प्रांताधिकारी याना जोगदंड यांचे कामकाज चांगलं वाटत होते असे रजेच्या अर्जात म्हटले आहे.

त्यांनतर मात्र त्यानी आरोग्य विभाग व जोगदंड याना टार्गेट केले त्यामुळे जोगदंड यांचे मानसिक व शारीरिक स्वास्थ्य बिघडल्याने त्यानी सविस्तर रजेचा अर्ज देऊन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा आरोग्य अधिकारी यांना वस्तुस्थिती सांगितली. त्यामुळे आज जिल्हा आरोग्य अधिकारी बी टी जमादार आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांनी जोगदंड यांची रजा मंजूर करत ढगे यांच्याकडे तात्पुरता पदभार सोपवला आहे.