बार्शी! आरणगाव येथे सालकरी गड्याची लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या.
बार्शी/प्रतिनिधी:

बार्शी तालुक्यातील आरणगाव येथे सालकरी गड्याने लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार 24 जानेवारी रोजी पहाटे साडेपाचच्या दरम्यान उघडकीस आला आहे. अमोल अशोक काजळे (वय 35) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार तालुका पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरणगाव येथील काजळे यांच्याकडे दोन महिन्यापासून सालकरी गडी म्हणून काम करत असणाऱ्या दत्ता बब्रुवान बनसोडे (वय ३१) रा. हरिजवळगा ता. जि. लातूर सध्या राहणारा आरणगाव यांनी अज्ञात कारणावरून लिंबाच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केली आहे. त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात नेण्यात आला आहे. सर्व शासकीय प्रक्रिया पार पडल्यानंतर मृतदेह कुटुंबीयांकडे सुपूर्द करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.